Nokia ने केली OPPO वर केस; भारतासह चार देशांमध्ये चीनी ब्रँडच्या अडचणीत वाढ 

By सिद्धेश जाधव | Published: July 12, 2021 07:53 PM2021-07-12T19:53:49+5:302021-07-12T19:54:39+5:30

Nokia vs Oppo: Nokia आणि OPPO दरम्यान 2018 मध्ये झालेल्या पेटंट लायसन्स अ‍ॅग्रिमेंट अ‍ॅग्रिमेंटची वैधता काही दिवसांपूर्वी संपली होती. या परवान्यांचे नूतनीकरण न करता ओप्पो नोकियाच्या टेक्नॉलॉजीचा वापर करत आहे, असे नोकियाने म्हटले आहे.  

Nokia sues oppo mobiles for patent infringement  | Nokia ने केली OPPO वर केस; भारतासह चार देशांमध्ये चीनी ब्रँडच्या अडचणीत वाढ 

Nokia ने केली OPPO वर केस; भारतासह चार देशांमध्ये चीनी ब्रँडच्या अडचणीत वाढ 

Next

Nokia टेक विश्वातील जुनी आणि विश्वासू कंपनी आहे. फक्त मोबाईल मार्केटच नव्हे तर टेक्नॉलॉजीसंबंधित इतर बाजारांमध्ये देखील नोकिया खूप सक्रिय आहे. फिनलँडमधील हि कंपनी वेळोवेळी नवीन टेक्नॉलॉजीचा शोध घेत असते. टेक विश्वातील या कंपनीसंबंधित एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नोकियाने चिनी स्मार्टफोन निर्माता OPPO वर पेटंट उल्लंघनांचा खटला दाखल केला आहे, हा खटला भारतासह इंग्लड, फ्रांस आणि जर्मनीमध्ये दाखल करण्यात आला आहे.  (Nokia files multiple lawsuits against Oppo over patent infringement)

मीडिया रिपोर्टनुसार, Nokia आणि OPPO दरम्यान 2018 मध्ये एक लायसन्स अ‍ॅग्रिमेंट झाली होती, त्यानुसार, नोकियाने बनवलेल्या एका टेक्नॉलॉजीचा वापर ओप्पो कंपनी आपल्या प्रोडक्ट्समध्ये करू शकते. ही कोणती टेक्नॉलॉजी आहे याची माहिती मात्र मिळाली नाही. काही दिवसांपूर्वी या लायसन्सची वैधता संपली त्यानंतर ओप्पो आणि नोकियाने मिळून या कराराचे नूतनीकरण करणार होते. परंतु बातमीनुसार, ओप्पो कंपनीने नूतनीकरण न करताच नोकियाच्या टेक्नॉलॉजीचा वापर सुरु ठेवला त्यामुळे Nokia ने OPPO वर खटला दाखल केला आहे.  

Nokia आणि OPPO मधील वाद चीनी कंपनीची मनमानी असल्याचे बोलले जात आहे. नोकियाने दिलेल्या विधानानुसार कंपनीने नवीन ऑफरसह लायसन्स अ‍ॅग्रिमेंट ओप्पोच्या समोर सादर केली होती, परंतु OPPO ने ती मान्य करण्यास नकार दिला. ओप्पोने लायसन्स रिन्यू न करता टेक्नॉलॉजीचा वापर करणे बेकायदेशीर आहे आणि म्हणून नोकियाने ओप्पोवर patent infringement म्हणजे पेटंटच्या उल्लंघनाचा खटला दाखल केला आहे.  

Web Title: Nokia sues oppo mobiles for patent infringement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.