अवाढव्य बॅटरी आणि शानदार डिस्प्लेसह Nokia T20 Tablet येतोय भारतात; देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?
By सिद्धेश जाधव | Published: October 28, 2021 11:48 AM2021-10-28T11:48:29+5:302021-10-28T11:48:36+5:30
Big Diwali Sale Flipkart 2021 Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर दिसला आहे. वेबसाईटच्या Big Diwali Sale प्रोमोशनमध्ये हा डिवाइस दिसला आहे.
नोकियाने काही दिवसांपूर्वी Android Tablet मार्केटमध्ये पाऊल टाकले होते. कंपनीने युरोपियन बाजारात Nokia T20 Tablet सादर केला होता. आता हा टॅब भारतीय बाजारात दाखल होईल असे वाटत आहे. Nokia T20 Tablet शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर दिसला आहे. वेबसाईटच्या Big Diwali Sale प्रोमोशनमध्ये हा डिवाइस दिसला आहे. 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये Nokia T20 Tablet भारतीय बाजारात सादर केला जाऊ शकतो.
Nokia T20 Tablet चे स्पेसीफाकेशन्स
Nokia T20 Tablet टॅबलेट 10.4-इंचाचा मोठा डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 400 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला टफ ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी Nokia T20 Tablet मध्ये ऑक्ट-कोर Unisoc T610 SoC देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा एक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि पुढील दोन वर्षाचे अपडेट देखील कंपनी देणार आहे.
या टॅबलेटमध्ये 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. त्याचबरोबर यात स्टिरियो स्पीकर देण्यात आले आहेत. Nokia T20 Tabletटॅबलेटमध्ये कंपनीने 8200mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि सिंगल चार्जमध्ये दिवसभर वापरता येईल.
Nokia T20 Tablet ची किंमत
Nokia T20 ची किंमत 199 युरो (अंदाजे 17,200 रुपये) ठेवण्यात आली आहे, ही फक्त Wi-Fi व्हेरिएंटची किंमत आहे. Wi-Fi + 4G मॉडेलसाठी 239 युरो (अंदाजे 20,600 रुपये) आहे. Wi-Fi व्हेरिएंटमध्ये 3GB RAM + 32GB स्टोरेज आणि 4GB RAM + 64GB स्टोरेज ऑप्शन देण्यात आले आहेत. Wi-Fi + 4G मॉडेल 4GB + 64GB सह येतो.