शानदार 2K डिस्प्ले आणि 8,200mAh बॅटरीसह स्वस्त Nokia T20 Tablet भारतात सादर; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: November 1, 2021 06:11 PM2021-11-01T18:11:09+5:302021-11-01T18:11:38+5:30
Nokia T20 Tablet Price In India: Nokia T20 Tablet मध्ये 8200mAh Battery, 2K Display आणि 4GB RAM असे फिचर मिळतात. हा टॅब फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
नोकियाने काही दिवसांपूर्वी Nokia T20 Tablet जागतिक बाजारात सादर केला होता. आता हा टॅबलेट कंपनीने भारतीय बाजारात उतरवला आहे. या डिवाइसमध्ये 8,200mAh battery आणि 10.4-inch 2K display असे शानदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया Nokia T20 Tablet ची किंमत आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती.
Nokia T20 Tablet ची किंमत
Nokia T20 टॅबलेटचे ओन्ली वायफाय आणि वायफाय+ एलटीई असे दोन व्हर्जन भारतात आले आहेत.
- Wi-Fi 3GB/32GB: 15,499 रुपये
- Wi-Fi 4GB/64GB: 16,499 रुपये
- Wi-Fi + LTE 4GB/64GB: 18,499 रुपये
हा डिवाइस ब्लू कलरमध्ये Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून 2 नोव्हेंबरपासून विकत घेता येईल.
Nokia T20 Tablet चे स्पेसीफाकेशन्स
Nokia T20 Tablet टॅबलेट 10.4-इंचाचा मोठा डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 400 नीट्स ब्राईटनेसला सपोर्ट करतो. या डिस्प्लेला टफ ग्लासची सुरक्षा देण्यात आली आहे. प्रोसेसिंगसाठी Nokia T20 Tablet मध्ये ऑक्ट-कोर Unisoc T610 SoC देण्यात आली आहे. त्याचबरोबर 4GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. हा एक अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि पुढील दोन वर्षाचे अपडेट देखील कंपनी देणार आहे.
या टॅबलेटमध्ये 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा एलईडी फ्लॅशसह देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ v5.0, USB Type-C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे पर्याय मिळतात. त्याचबरोबर यात स्टिरियो स्पीकर देण्यात आले आहेत. Nokia T20 Tablet मध्ये कंपनीने 8200mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. ही बॅटरी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि सिंगल चार्जमध्ये दिवसभर वापरता येईल.