टॅबलेट सेगमेंटमध्ये होणार नोकियाची एंट्री; Nokia T20 टॅब येऊ शकतो लवकरच बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 12:09 PM2021-07-29T12:09:03+5:302021-07-29T12:09:51+5:30
Nokia T20 Tablet price: नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे.
काही दिवसांपूर्वी नोकियाने बाजारात तीन मोबाईल लाँच केले होते. यात एक रगेड फोन Nokia XR20, एक लो बजेट स्मार्टफोन Nokia C30 आणि एक फिचर फोन Nokia 6310 (2021) चा समावेश करण्यात आलाहोता . आता कंपनी आपल्या पहिल्या टॅबलेटवर काम करत असल्याची बातमी येत आहे. नोकियाच्या आगामी अँड्रॉइड टॅबलेटची माहिती सर्वप्रथम रशियाच्या सर्टिफिकेशन साइटच्या माध्यमातून मिळाली होती. नोकियाचा टॅबलेट मार्केटमध्ये Nokia T20 नावाने सादर केला जाऊ शकतो. हा डिवाइस लाँचपूर्वी काही रिटेल वेबसाइटवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून नोकिया टॅबलेटची माहिती समोर आली आहे.
Nokia T20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia T20 टॅबलेटमध्ये 10.36-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. या टॅबमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली जाऊ शकते. रिटेल प्लॅटफॉर्मच्या लिस्टिंगनुसार, नोकिया टी-20 टॅबलेट ओनली वाय-फाय आणि 4G अश्या दोन व्हेरिएंटमध्ये सादर केला जाऊ शकतो. हा टॅबलेट ब्लू रंगात वेबसाईटवर लिस्ट करण्यात आला आहे.
Nokia T20 ची किंमत
Nokia T20 टॅबलेटचे Wi-Fi आणि 4G असे दोन मॉडेल बाजारात दाखल होऊ शकतात. नोकिया टॅबलेटच्या Wi-Fi व्हेरिएंटची किंमत 185 यूरो (अंदाजे 20,000 रुपये) असू शकते. तसेच टॅबलेटचा 4G मॉडेल 168 यूरो (अंदाजे 21,000 रुपये) मध्ये बाजारात दाखल होऊ शकतो.
काही दिवसांपूर्वी नोकियाने जागतिक बाजारात एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन Nokia XR20 नावाने लाँच केला होता. हा फोन स्क्रॅच, ड्रॉप, टेंपरेचर आणि वॉटर रेजिस्टंट आहे.
Nokia XR20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.