Nokia करणार नववर्षाची जोरदार सुरुवात; येतोय 50MP कॅमेरा आणि 4900mAh बॅटरीसह स्मार्टफोन  

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 12:07 PM2022-01-01T12:07:57+5:302022-01-01T12:08:38+5:30

Nokia लवकरच आपला भन्नाट स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये सादर करू शकते. या फोनमध्ये 4GB RAM, 50MP Camera आणि 4900mAh बॅटरी मिळू शकते.

Nokia will soon launch a smartphone with 50mp primary rear camera  | Nokia करणार नववर्षाची जोरदार सुरुवात; येतोय 50MP कॅमेरा आणि 4900mAh बॅटरीसह स्मार्टफोन  

Nokia करणार नववर्षाची जोरदार सुरुवात; येतोय 50MP कॅमेरा आणि 4900mAh बॅटरीसह स्मार्टफोन  

Next

Nokia फॅन्ससाठी आनंदाची बातमी आली आहे, कंपनी एका नव्या स्मार्टफोनवर काम करत आहे. विविध लिस्टिंग्स आणि रिपोर्ट्समधून या फोनचा खुलासा झाला आहे. रिपोर्टनुसार हा नोकिया फोन 50 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह बाजारात येईल. तसेच या फोनचे 6 व्हेरिएंट सादर केले जातील. या आगामी नोकियास्मार्टफोनच्या नावाची माहिती मिळाली नाही, परंतु मोबाईलचा मॉडेल नंबर समजला आहे.  

आगामी नोकिया स्मार्टफोन  

नोकियाचा स्मार्टफोन 6 व्हेरिएंटमध्ये येऊ शकतो. सर्टिफिकेशन वेबसाईटवर हा फोन TA-1418, TA-1404, TA-1412, TA-1415, TA-1405 आणि TA-1401 अशा सहा मॉडेल नंबर्ससह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार या फोनमध्ये बॅक पॅनलवर वर्टिकल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.  

नोकियाच्या आगामी स्मार्टफोनच्या स्पेक्सची संपूर्ण माहिती मिळाली नाही. परंतु, लिस्टिंगनुसार कंपनी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा देऊ शकते. इतर दोन रियर कॅमेरा सेन्सर 2 मेगापिक्सल रिजोल्यूशनसह येऊ शकतात. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.  

नोकिया TA-1404 एक ड्यूल सिम स्मार्टफोन आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. TA-1412 मॉडेल एक सिंगल सिम स्मार्टफोन आहे, जो 4 जीबी पर्यंत रॅम आणि 128 जीबी पर्यंतच्या स्टोरेजसह येईल. लिस्टिंगमध्ये Unisoc प्रोसेसरचा उल्लेख आहे. त्यामुळे हा एक बजेट फोन असेल, हे स्पष्ट झालं आहे. पॉवर बॅकअपची जबाबदारी 4900mAh च्या बॅटरीवर असेल.  

हे देखील वाचा:

OnePlus फॅन्ससाठी बॅड न्यूज! भारतातील 3 मॉडेल्स होणार बंद, यावर्षी लाँच झालेल्या वनप्लसचाही समावेश

स्वस्त 5G Phone! 6000mAh बॅटरी, 11GB RAM ची ताकद; Xiaomi-Realme च्या अडचणी वाढणार

Web Title: Nokia will soon launch a smartphone with 50mp primary rear camera 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.