रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 04:56 PM2021-06-24T16:56:39+5:302021-06-24T16:59:40+5:30

Nokia Smartphones India Launch: Nokia च्या इंडियन वेबसाइटवर Nokia X10, X20 लिस्ट करण्यात आले आहेत.

Nokia x10 x20 listed for india market launch soon  | रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन 

रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन 

googlenewsNext

Nokia ने एप्रिलमध्ये Nokia X-सीरीजमध्ये Nokia X10 आणि Nokia X20, C-सीरिजमध्ये Nokia C10 आणि C20 आणि तर G-सीरिजमध्ये Nokia G10 आणि G20 स्मार्टफोन लाँच केले होते. आता कंपनी भारतात Nokia X10 आणि Nokia X20 स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे, अशी चर्चा आहे. लाँचपूर्वी हे दोन्ही हँडसेट Nokia च्या भारतीय वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. या लिस्टिंगमध्ये Nokia X10 आणि X20 हँडसेटची SAR व्हॅल्यू दर्शवण्यात आली आहे. तसेच वेबसाइटच्या SAR सेक्शनमध्ये Nokia C20, G10 आणि Nokia G20 स्मार्टफोन देखील लिस्ट करण्यात आले आहेत. यावरून हे फोन लवकरच भारतात लाँच केले जातील असा अंदाज वर्तवला जात आहे.  

Nokia X10, X20, C20, G10 आणि G20 ची लिस्टिंग 

Nokia च्या इंडियन वेबसाइटवर Nokia X10, X20 च्या लिस्टिंगची माहिती टेक वेबसाइट NokiaMob ने दिली होती. SAR सेक्शनमध्ये हे हँडसेट दिसल्यामुळे नोकिया भारतात X, G आणि C सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन्स लाँच करण्याची तयारी करत आहे, हे निश्चित झाले आहे. कंपनी भारतीय वेबसाईटवर देशात लाँच न होणारे स्मार्टफोन्स SAR सेक्शनमध्ये लिस्ट करत नाही.  

Nokia X10 आणि Nokia X20 चे स्पेसिफिकेशन्स 

Nokia X सीरीजचे हे फोन्स एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत, त्यामुळे या फोन्सची माहिती उपलब्ध झाली आहे. X सीरिजच्या या फोन्समध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिजोल्यूशन 1080 x 2400 पिक्सल आहे. Nokia X10 आणि Nokia X20 मध्ये अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे. या स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 480 चिपसेट देण्यात आला आहे.  

Nokia X10 आणि Nokia X20 मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आला आहे. दोन्ही फोन्समध्ये खास गुगल असिस्टंट बटण आहे. पावर बॅकअपसाठी Nokia X10 आणि Nokia X20 मध्ये 4,470एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.  

Nokia X10 च्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा मुख्य सेन्सर, 5MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा माक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर मिळतो. या फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 6GB पर्यंतच्या रॅम आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.  

Nokia X20 मधील क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये 64MP चा मुख्य सेन्सर मिळतो, इतर सेन्सर्स Nokia X10 सारखे आहेत. परंतु या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia X20 मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आली आहे. भारतात यांची किंमत किती असेल हे मात्र अजूनतरी सांगता येणार नाही.  

Web Title: Nokia x10 x20 listed for india market launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.