नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?  

By सिद्धेश जाधव | Published: July 1, 2021 01:07 PM2021-07-01T13:07:16+5:302021-07-01T13:14:30+5:30

Nokia x60 Series Smartphone: चीनमध्ये गुगलवर बंदी असल्यामुळे अँड्रॉइडला पर्याय म्हणून नोकिया हार्मोनी ओएसचा समावेश करेल, तसेच ही भागेदारी चीनपूर्ती मर्यादित राहील.

Nokia x60 series smartphone may come with 200mp camera 6000mah battery and harmonyos  | नोकिया देणार अँड्रॉइडला डच्चू? 200MP कॅमेरा असलेल्या फोनसाठी हार्मोनी ओएसशी हात मिळवणी?  

अमेरिकेने हुवावेवर बंदी घातल्यानंतर कंपनीने 2019 मध्ये गुगलच्या अँड्रॉइड पर्याय म्हणून हार्मनी ओएस लाँच केला होता. सौजन्य : nokiamob.net

googlenewsNext

नोकियाचेस्मार्टफोन बाजारात पुनरागमन झाल्यापासून कंपनीने अँड्रॉइड ओएसची साथ सोडली नाही. ही कंपनी स्टॉक अँड्रॉइड स्मार्टफोन्ससाठी ओळखली जाते. परंतु आता अश्या अफवा येत आहेत कि HMD Global आपल्या नोकिया स्मार्टफोन्समध्ये हुवावेच्या HarmonyOS चा समावेश करू शकते. याची सुरुवात कंपनी Nokia 60 सीरीजच्या स्मार्टफोनपासून करू शकते. अमेरिकेने हुवावेवर बंदी घातल्यानंतर कंपनीने 2019 मध्ये गुगलच्या अँड्रॉइड पर्याय म्हणून हार्मनी ओएस लाँच केला होता. नोकिया एक्स 60 हा HarmonyOS सह सादर होणारा सीरिजमधील पहिला स्मार्टफोन असू शकतो.  (Nokia X60 With Huawei’s Harmony Os, 200 Mp Camera, And 144 Hz Refresh Rate Display)

नोकिया स्मार्टफोन युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनमधील स्टॉक अँड्रॉइडचा अनुभव आवडतो. त्यामुळे ही बातमी धक्कादायक नक्कीच आहे. चीनमध्ये गुगलवर बंदी असल्यामुळे अँड्रॉइडला पर्याय म्हणून नोकिया हार्मोनी ओएसचा समावेश करेल, तसेच ही भागेदारी चीनपूर्ती मर्यादित राहील, असा अंदाज काही रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे. अजूनतरी कंपनीने आगामी नोकिया X60 सीरीज आणि हार्मनी ओएस बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.  

हे देखील वाचा:  रियलमी-शाओमीच्या अडचणी वाढणार? भारतात येतील Nokia चे 5 नवीन धमाकेदार फोन

200MP कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी 

नोकिया X60 सीरीजमध्ये नोकिया X60 आणि नोकिया X60 प्रो असे दोन हँडसेट लाँच करण्यात येतील, अशी माहिती लिक्समधून समोर आली आहे. नोकिया X60 सीरीजमध्ये कंपनी 200 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा, कर्व्ड डिस्प्ले आणि 6000mAh ची मोठी बॅटरी देऊ शकते. काही दिवसांपूर्वी आलेल्या शाओमीच्या 200MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर कोणत्याही 200MP कॅमेरा स्मार्टफोनची माहिती समोर आली नाही.  

Web Title: Nokia x60 series smartphone may come with 200mp camera 6000mah battery and harmonyos 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.