मिल्ट्री ग्रेड मजबूत बॉडीसह Nokia XR20 Rugged Phone भारतात लाँच; इतकी आहे किंमत
By सिद्धेश जाधव | Published: October 18, 2021 05:49 PM2021-10-18T17:49:34+5:302021-10-18T17:49:43+5:30
Strong and Waterproof Phone Nokia XR20 Price In India: Nokia XR20 हा मिल्ट्री ग्रेड बॉडी असलेला Rugged Phone भारतात 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
काही दिवसांपूर्वी Nokia ने आपल्या दणकट फोनची घोषणा केली होती. गेल्या आठवड्यात प्री बुकिंगची तारीख सांगितल्यानंतर कंपनीने आज Nokia XR20 आज भारतात सादर केला आहे. तसेच आज कंपनीने Nokia XR20 India Price ची माहिती दिली आहे. हा मिल्ट्री ग्रेड बॉडी असलेला Rugged Phone भारतात 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Nokia XR20 ची किंमत
Nokia XR20 चे एकमेव 6GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज असलेला व्हेरिएंट भारतात आला आहे. ज्याची किंमत 46,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 30 ऑक्टोबरपासून Ultra Blue आणि Granite कलरमध्ये विकत घेता येईल. Nokia XR20 स्मार्टफोन 20 ते 29 ऑक्टोबर दरम्यान प्री-बुक केल्यास 3,599 रुपयांचे Nokia Power Earbuds Lite आणि एक वर्षाचा स्क्रीन प्रोटेक्शन प्लॅन मोफत मिळेल.
Nokia XR20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Nokia XR20 5G एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन आहे. हा उंचावरून पडून देखील सुरक्षित राहू शकतो. यात IP68 वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह स्क्रॅच रेजिस्टन्स, ड्रॉप रेजिस्टन्स आणि टेम्परेचर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. यामुळे या स्मार्टफोनला कोणतेही बॅक कव्हर किंवा स्क्रीन गार्ड लावण्याची गरज नाही.