उंचावरून पडला तरी फुटणार नाही Nokia XR20 स्मार्टफोन; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स
By सिद्धेश जाधव | Published: October 30, 2021 03:43 PM2021-10-30T15:43:26+5:302021-10-30T15:43:33+5:30
Nokia XR20 Price In India: Nokia XR20 आजपासून भारतात विकत घेता येईल. हा फोन ग्रॅनाईट आणि अल्ट्रा ब्लू कलर अशा दोन रंगात उपलब्ध होईल.
Nokia XR20 Price In India: काही दिवसांपूर्वी Nokia ने आपल्या नवीन रगेड स्मार्टफोन Nokia XR20 भारतात सादर केला होता. आजपासून हा फोन देशात खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. हा मिल्ट्री ग्रेड बॉडी असलेला Rugged Phone भारतात 46,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
Nokia XR20 किंमत आणि ऑफर
Nokia XR20 आजपासून भारतात विकत घेता येईल. हा फोन ग्रॅनाईट आणि अल्ट्रा ब्लू कलर अशा दोन रंगात उपलब्ध होईल. सध्या हा फोन नोकियाच्या वेबसाईटवारीं विकत घेता येईल. या नवीन दणकट स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना 3,599 रुपयांचे नोकिया पॉवर इयरबड्स लाईट मोफत मिळतील. तसेच एक वर्षांचे फ्री स्क्रीन डॅमेज प्रोटेक्शन देखील मिळेल.
Nokia XR20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
Nokia XR20 5G एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन आहे. हा उंचावरून पडून देखील सुरक्षित राहू शकतो. यात IP68 वॉटर अँड डस्ट रेजिस्टन्ससह स्क्रॅच रेजिस्टन्स, ड्रॉप रेजिस्टन्स आणि टेम्परेचर रेजिस्टन्स देण्यात आला आहे. यामुळे या स्मार्टफोनला कोणतेही बॅक कव्हर किंवा स्क्रीन गार्ड लावण्याची गरज नाही.