दणकट Nokia XR20 लाँच; इतका मजबूत कि बॅक कव्हरची आवश्यकताच भासणार नाही
By सिद्धेश जाधव | Published: July 27, 2021 02:48 PM2021-07-27T14:48:34+5:302021-07-27T14:50:22+5:30
Nokia XR20 Rugged Smartphone Launch: Nokia XR20 मध्ये कंपनीने 48 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि 6GB रॅम दिला आहे.
काही दिवसांपूर्वी नोकियाने एक स्मार्टफोन टीज केला होता आणि लिहिले होते कि या स्मार्टफोनला कव्हर घालण्याची गरज नाही. आज कंपनीने तो स्मार्टफोन म्हणजे Nokia XR20 फोन लाँच केला आहे. हा एक मिल्ट्री ग्रेड रगेड स्मार्टफोन आहे. हा फोन स्क्रॅच, ड्रॉप, टेंपरेचर आणि वॉटर रेजिस्टंट आहे. HMD Global ने हा फोन सध्या अमेरिकेत लाँच केला आहे. हा फोन भारतात कधी येईल याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.
Nokia XR20 ची किंमत
Nokia XR20 स्मार्टफोन अमेरिकेत USD 550 (सुमारे 41,000 रुपये) आहे. ही किंमत या स्मार्टफोनच्या 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची आहे. 24 ऑगस्टपासून हा फोन Ultra Blue आणि Granite कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.
Nokia XR20 चे स्पेसिफिकेशन्स
Nokia XR20 मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले 1080×2400 पिक्सल रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Gorilla Glass Victus च्या सुरक्षेसह येतो. पंच होल कॅमेरा असेलेल्या नोकिया XR20 मध्ये Qualcomm Snapdragon 480 चिपसेट आणि Android 11 वर चालतो. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. HMD Global या स्मार्टफोनमध्ये 3 वर्ष OS अपडेट आणि 4 वर्ष मासिक सेफ्टी अपडेट देणार आहे.
फोटोग्राफीसाठी Nokia XR20 मध्ये कंपनीने ड्युअल रियर कॅमेरा दिला आहे. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. कनेक्टिविटीसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये USB Type-C पोर्ट, 3.5mm जॅक आणि ब्लूटूथ 5.1 आहे. या फोनमधील 4630mAh ची बॅटरी 18W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.