नोकिया एक्सच्या आगमनाचे संकेत

By शेखर पाटील | Published: April 30, 2018 02:33 PM2018-04-30T14:33:47+5:302018-04-30T14:33:47+5:30

नोकिया कंपनीने आयफोन एक्सप्रमाणेच डिझाईन आणि अतिशय उत्तमोत्तम फिचर्स असणारा नोकिया एक्स हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली आहे.

Nokia X's arrival signal | नोकिया एक्सच्या आगमनाचे संकेत

नोकिया एक्सच्या आगमनाचे संकेत

googlenewsNext

नोकिया कंपनीने आयफोन एक्सप्रमाणेच डिझाईन आणि अतिशय उत्तमोत्तम फिचर्स असणारा नोकिया एक्स हा उच्च श्रेणीतील स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली आहे. अ‍ॅपलने अलीकडेच सादर केलेला आयफोन एक्स हा स्मार्टफोन जगभरात लोकप्रिय ठरला आहे. विशेष करून याच्या डिझाईनची युजर्सला भुरळ पडली आहे. या पार्श्‍वभूमिवर, आयफोन एक्सच्या डिझाईनसह अन्य फिचर्सची हुबेहूब कॉपी करण्याची चढाओढ सुरू झाल्याचे दिसून येत आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या हुआवे पी२०  मालिकेतील स्मार्टफोन्स तसेच विवो व्ही९ मॉडेलच्या डिझाईनवर आयफोन एक्सचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला आहे. तर वन प्लस ६, ओप्पो एफ७, एलजी जी ७ आदी आगामी स्मार्टफोन्समध्येही आयफोन एक्सचे अनेक फिचर्स कॉपी केलेले असतील अशी माहिती अनेक लीक्सच्या माध्यमातून समोर आली आहे. यातच आता एचएमडी ग्लोबल कंपनीच्या नोकिया एक्स या मॉडेलमध्येही याच प्रकारची कॉपी केलेली असेल असे स्पष्ट झाले आहे.

एचएमडी ग्लोबल कंपनीने तर अगदी नावातच एक्स या शब्दाचा समावेश केला आहे. तसेच या मॉडेलच्या डिझाईनसह अन्य मॉडेल्सही आयफोन एक्सप्रमाणेच असतील अशी माहिती कंपनीने आपल्या वेईबो या सोशल साईटच्या अकाऊंटवरून दिलेल्या प्राथमिक माहितीवरून दिसून येत आहे. नोकिया एक्स या आगामी स्मार्टफोनमध्ये आयफोन एक्सप्रमाणेच एज-टू-एज या प्रकारातील डिस्प्ले असू शकतो. याच्या वरील बाजूस इयरपीस, फ्रंट कॅमेरा आणि प्रॉक्झिमिटी सेन्सरसाठी नॉच दिलेला असेल. याच्या मागील बाजूस काचाचे आवरण असून यात व्हर्टीकल या पध्दतीते ड्युअल कॅमेरा सेटअप आणि याच्या खाली फिंगरप्रिंट स्कॅनर असेल. यामुळे याचा लूक आयफोन एक्सप्रमाणेच असू शकतो. अन्य लीक्सच्या माध्यमातून नोकिया एक्सचे विविध फिचर्स आधीच समोर आले आहेत. यामध्ये ५.८ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा सेटअप, ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोअरेज व ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोअरेज असे दोन पर्याय आदींचा समावेश असू शकतो. नोकिया एक्स हे मॉडेल १६ मे रोजी लाँच होणार असून लागलीच काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे.

(नोकिया एक्स मॉडेलचे एचएमडी ग्लोबल कंपनीने जारी केलेले छायाचित्र)

Web Title: Nokia X's arrival signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.