iPhone चं टेन्शन वाढवण्यासाठी Nokia आणतोय 3 दिवस चालणारा खास Smartphone, फीचर्स वाचून थक्क व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 09:37 AM2022-12-25T09:37:55+5:302022-12-25T09:39:32+5:30
माध्यमांतील वृत्तांनुसार, नोकिया जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्याचे नाव Nokia Zeno Lite 2022 अथवा Nokia Zeno Lite 2023, असू शकते.
आपण मोबाईल वापरत असाल तर नोकिया हे नाव नक्कीच ऐकले असेल. एक काळ होता, जेव्हा नोकिया बाजारावर राज्य करायचा. त्यांचा प्रत्येक फोन अत्यंत लोकप्रीय होता. पण स्मार्टफोन आला आणि नोकियाचे राज्य गेले. मात्र आता तो पुन्हा एकदा बाजारात उतरण्याच्या तयारीत आहे. नोकिया एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन तयार करत असल्याचे वृत्त आहे. नोकिया दरवर्षी कमी बजेटपासून ते फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च करतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, नोकिया जो स्मार्टफोन लॉन्च करणार आहे त्याचे नाव Nokia Zeno Lite 2022 अथवा Nokia Zeno Lite 2023, असू शकते.
Nokia Zeno Lite Launch Date -
Nokia Zeno Lite चे वृत्त आल्यापासून, हा केव्हा लॉन्च होणार आणि काय काय फीचर्स असणार हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र, कंपनीने या फोन संदर्भात अद्याप काहीही सांगितलेले नाही. महत्वाचे म्हणजे हा फोन लॉन्च होणार की नाही यासंदर्भातही अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्यातरी केवळ अंदाजच बांधले जात आहेत.
Nokia Zeno Lite Expected Specifications -
माध्यमांतील वृत्तांनुसार, Nokia Zeno Lite मध्ये 6.9-इंच का सुपर AMOLED डिस्प्ले असेल, तो Gorilla Glass 7 ने प्रोटेक्टेड असेल. यात ऑलवेज ऑन डिस्प्ले असेल, असा कयास लावला जात आहे. म्हणजेच फोनची स्कीन नेहमीच ऑन असेल. पण फार बॅटरी खानार नाही.
Nokia Zeno Lite Expected Camera -
वृत्तांनुसार, Nokia Zeno Lite मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळू शकते. यात 108MP ची प्राइमरी लेन्स, 32MP ची अल्ट्रा वाईड, 16MP वाईड आणि 5MP चे डेप्थ सेन्सर असेल. याच बरोबर समोरच्या बाजूने 64MP चा सेल्फी शूटर मिळू शकतो.
Nokia Zeno Lite Expected Battery
Nokia Zeno Lite च्या बॅटरीसंदर्भात बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 7100mAh ची बॅटरी असेल आणि हिला 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट असेल, अशी अफवा आहे. याच बरोबर हा फोन 3 दिवसांपर्यंत आरामात चालेल, असेही बोलले जात आहे. फोन मध्ये 8/12GB RAM आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेज मिळू शकते. या फोनच्या किंमती संदर्भात अद्याप कुठल्याही प्रकराची माहिती नाही. जसे की, आम्ही वर सांगिल्याप्रमाणे, या फोनसंदर्भात कंपनीने अद्याप कुठल्याही प्रकारचा उल्लेखही केलेला नाही. हे केवळ माध्यमांतील अंदात आहेत. कदाचित कंपनी या फोनसंदर्भात अद्याप केवळ विचारच करत असेल, असेही असू शकते.