नोकियाचा जबरदस्त फोन येणार...महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2019 06:00 PM2019-01-31T18:00:21+5:302019-01-31T18:02:32+5:30

पुढील महिन्यात बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये काही नवीन फोन लाँच करणार आहे.

Nokia's feature phone call... have to cahrge battery once a month | नोकियाचा जबरदस्त फोन येणार...महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज होणार

नोकियाचा जबरदस्त फोन येणार...महिन्यातून एकदाच बॅटरी चार्ज होणार

नवी दिल्ली : विंडोज ओएसचा प्रयोग फसल्यानंतर भारतासह जगभरात नोकियाने गमावलेली पत पुन्हा मिळविण्यास सुरुवात केली आहे. HMD ग्लोबलची मालकी असलेली ही कंपनी पुढील महिन्यात बार्सिलोनामध्ये होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये काही नवीन फोन लाँच करणार आहे. यामध्ये खास म्हणजे तब्बल महिनाभर बॅटरी चालू शकणारा फोन लाँच केला जाणार आहे.


नोकिया 24 फेब्रुवारीला होणाऱ्या या इव्हेंटमध्ये Nokia 9 PureView आणि Nokia 6.2 शिवाय अन्य काही फिचरफोन लाँच करणार आहे. या फिचर फोनबाबत आजपर्यंत दावेच करण्यात येत होते. मात्र, चीनच्या टीना या सर्टिफिकेशन वेबसाईटवर हा फोन रजिस्टर करण्यात आला आहे. यामुळे Nokia TA -1139 हा फोन 2.4 इंचाच टीएफटी डिस्प्लेसह लाँच केला जाणार आहे.

 
या फोनमध्ये 8 एमबी रॅम आणि 16 एमबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये 32 जीबीचे मायक्रोएसडी कार्डही चालू शकणार आहे. या फोनमध्ये  1020 mAh बॅटरी देण्यात येणार असून ही बॅटरीच या फोनचे वैशिष्ट्य असणार आहे. ही बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल एक महिना चालणार आहे. 


कंपनीने या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह 3 मेगापिक्सलचा कॅमेराही दिला आहे. या फोनचे वजन 83.6 ग्रॅम आहे. तसेच हा नोकियाचा नवा फोन रेड, ग्रे आणि ब्लॅक रंगातही उपलब्ध होणार आहे. 

Web Title: Nokia's feature phone call... have to cahrge battery once a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.