चुकूनही ठेवू नका हे १० कॉमन पासवर्ड; काही सेकंदातच होतात क्रॅक, पाहा संपूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 06:54 PM2022-11-16T18:54:58+5:302022-11-16T18:59:16+5:30
सर्वात सोप्या १० पासवर्डची यादी समोर आली आहे.
नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियाचे युग आहे, मोबाईल हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. सर्वत्र सोशल मीडियाचे जाळे पसरले आहे. मोबाईल, लॅपटॉप यामुळे सगळ्यांची कामे सोपी झाली आहेत. मात्र सध्या समोर आलेल्या रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. २०२२ मध्ये लोक आपल्या मोबाईल फोनच्या पासवर्डबद्दल गंभीर नसल्याचे उघड झाले आहे.
लोक सहज उघडता येतील असे पासवर्ड वापरत आहेत. मात्र याचा फायदा हॅकर्स घेऊ शकतात. NordPass ने २०२२ च्या सर्वात कॉमन पासवर्डची यादी शेअर केली आहे. यामध्ये भारतातील ३.५ लाख लोक साइन अप करताना त्यांच्या पासवर्डमध्ये Password हा शब्द वापरतात. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की ७५ हजारांहून अधिक भारतीय त्यांच्या पासवर्डसाठी BigBasket हा शब्द वापरत आहेत.
टॉप-10 पासवर्ड
यावर्षीच्या टॉप-10 कॉमन पासवर्डमध्ये 123456, bigbasket, password, 12345678, 123456789, pass@123, 1234567890, anmol123, abcd1234 आणि googledummy यांचा समावेश आहे. हे पासवर्ड हजारो लोक वापरतात. भारताशिवाय इतर ३० देशांमध्येही हे संशोधन करण्यात आले. रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले की, अनेक लोक guest, vip, 123456 सारखे पासवर्ड वापरतात. दरवर्षी संशोधकांना हा पॅटर्न लक्षात येतो की स्पोर्ट्स टीम, मूव्ही कॅरेक्टर आणि फूड आयटम पासवर्डच्या यादीत अव्वल स्थानी असतात. लोक हे पासवर्ड मोठ्या प्रमाणात ठेवत असतात. हे पासवर्ड खूप सोपे असल्यामुळे हॅकर्संना याची मदत होते.
असा पासवर्ड ठेवा
पासवर्ड शक्यतो मोठा ठेवा आणि त्यात चिन्हे, संख्या आणि अक्षरांचा वापर करा. असे पासवर्ड लक्षात ठेवणे कठीण होते, मात्र डेटा सुरक्षिततेसाठी हे आवश्यक आहे. प्रत्येक अकाउंट्ससाठी वेगवेगळे पासवर्ड वापरा. त्यामुळे हॅकर्संना पासवर्ड क्रॅक करणे सोपे जात नाही. याशिवाय वेळोवेळी पासवर्ड बदलत राहा.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"