Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 03:15 PM2024-10-10T15:15:34+5:302024-10-10T15:16:14+5:30

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांचे आज निधन झाले. त्यांनी ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

Not Jio, Ratan Tata Changed Telecom Sector Internet made cheaper with calls | Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

Jio नव्हे, रतन टाटांनी दूरसंचार क्षेत्र बदलले; कॉलसह इंटरनेट स्वस्त केले

उद्योगपती रतन टाटा यांचे काल निधन झाले. त्यांचे निधनाने जगभरात दु:ख व्यक्त केले जात आहे. त्यांनी उद्योग क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. तसेच त्यांनी टेलिकॉम क्षेत्रातही जिओ येण्याआधी मोठी क्रांती केली होती. उद्योगपती रतन टाटा यांनी २००८ मध्येच टेलिकॉम क्षेत्रात पाऊल ठेवले होते.

उद्योगपती रतन टाटा यांनी टाटा समूहाचा विस्तार करताना, त्यांनी अनेक नवीन व्यवसाय सुरू केले, त्यापैकी टाटाची दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेस होती, या कंपनीने डोकोमोसह देशातील सामान्य लोकांसाठी मोबाइल कॉलिंग स्वस्त केले.

कार नको, सायकल वापर... ऐकताच चालत गेले; जर त्याच क्षणी मनावर ताबा ठेवला नसता तर 'रतन टाटा' बनले नसते

टाटा समूहाची दूरसंचार कंपनी Tata Teleservices Limited आणि जपानची NTT DoCoMo यांनी संयुक्तपणे Tata DoCoMo कंपनी भारतात सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून रतन टाटा यांना देशात मोबाईल कॉलिंग परवडणारी सेवा द्यायची होती. त्यावेळी खासगी कंपन्या भारतात मोबाईल व्हॉईस कॉलिंगसाठी प्रति मिनिट दर आकारत होत्या. यावेळी टाटा डोकोमो आपल्या ग्राहकांसाठी प्रति सेकंद शुल्क आकारत होती.

टाटा डोकोमोने १ पैसा प्रति सेकंद दर योजना लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा चेहरा बदलला. पूर्वी दूरसंचार कंपनी प्रति मिनिट चार्ज करत होती. म्हणजे जर तुम्ही १० सेकंद किंवा 59 सेकंद बोलला तर तुम्हाला पूर्ण मिनिटासाठी पैसे द्यावे लागतील. Tata DoCoMo ने प्रति सेकंद दरांसह जेवढं बोलाल तेवढे पैसे अशी बिलिंग प्रणाली लाँच करून भारतीय दूरसंचार क्षेत्राचा पूर्णपणे कायापालट केला आहे.

दूरसंचार कंपन्यांना प्रति मिनिट बिलिंग टॅरिफमधून प्रचंड नफा मिळत होता. उद्योगपती रतन टाटा यांनी कंपनीच्या नफ्याचा विचार न करता देशातील सर्वसामान्यांसाठी परवडणारी बिलिंग प्रणाली सुरू केली. यासह त्यांनी एसएमएससाठी नवीन प्लॅन आणले, हे खूप लोकप्रिय झाले. त्यावेळी मोबाईल इंटरनेट खूप महाग होते. टाटा ग्रुपची ही कंपनी पे-पर-साइट मॉडेल घेऊन आली होती. मात्र, त्यावेळी फारच कमी वापरकर्ते मोबाईल इंटरनेट वापरत होते.

रतन टाटा यांच्या फुल प्रुफ प्लॅनिंगमुळे ही कंपनी लवकरच लोकप्रिय झाली. टाटा समूहाने फक्त ५ महिन्यांत १० मलियनहून अधिक ग्राहक जोडले आहेत. यानंतर, इतर दूरसंचार कंपन्यांनीही त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये प्रति मिनिट ते प्रति सेकंद बदल केला.

टाटा डोकोमोच्या भारतात सुरू झाल्यानंतर एका वर्षात देशातील मोबाइल कनेक्शनची संख्या २९ टक्क्यांनी वाढून ४३ टक्क्यांवर गेली होती. २००९ मध्ये भारतात मोबाईल फोन वापरकर्त्यांची संख्या ५० कोटी होती, ही संख्या २०१४ पर्यंत ८० कोटींवर गेली होती.

Web Title: Not Jio, Ratan Tata Changed Telecom Sector Internet made cheaper with calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.