5G चा फोनच नाही, तर टीव्हीही येणार; 'ही' मोठी कंपनी करणार लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 04:32 PM2019-05-02T16:32:32+5:302019-05-02T16:34:15+5:30
भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे.
भारतात अद्याप 5 जीने युक्त फोन मिळणे दूरापास्त असले तरीही जगभरामध्ये हे फोन लोक वापरू लागले आहेत. आता तर चीनची इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील मोठी कंपनी 8K हाय-रिझोल्यूशन असणारा 5जी चा टीव्हीच लाँच करणार आहे. या कंपनीने तशी घोषणाच केली आहे. या कंपनीने नुकताच 5 जी फोनही लाँच केला आहे.
Huawei ही कंपनी पुढील काळात 5G वर आधारित तीन डिव्हाईस लाँच करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये हा टीव्ही आहे. कंपनी केवळ स्मार्टफोनच नाही तर हायएंड अप्लाएन्स बाजारावरही छाप पाडण्याच्या प्रयत्नात आहे. Huawei ही कंपनी राऊटर, मोडेम, डाटाकार्ड सह अन्य इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनविते. तसेच या कंपनीचे स्मार्टफोन ब्रँडही आहेत.
इंग्रजी वेबसाईट Nikkei ने दिलेल्या बातमीनुसार Huawei चा हा अल्ट्रा हाय डेफिनिशन 8 के रिझोल्युशनचा टीव्ही असणार आहे. हा एकमेव टीव्ही असा आहे ज्य़ामध्ये 5 जी मोडेम असणार आहे. याचाच अर्थ या टीव्हीमुळे फायबर ऑप्टिक्स किंवा केबल ऑपरेटरची गरज राहणार नाही. इंटीग्रेटेड मोडेम म्हणजे ते स्मार्ट टीव्ही, दुसऱ्या उपकरणांसाठी हाय स्पीड इंटरनेटचेही काम करणार आहे. एका अंदाजानुसार हा टीव्ही 360 डिग्री व्हिडीओ स्ट्रीम करण्यातही सक्षम असणार आहे. याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Huawei देणार Samsung ला टक्कर
Huawei ने त्यांची उत्पादने कंझ्यूमर अप्लायन्सेसच्या श्रेणीमध्ये विस्तार करण्याचे ठरविले आहे. यामध्ये सॅमसंग आणि एलजी आघाडीवर आहेत. Samsung टीव्ही, स्मार्टफोन, विअरेबस आणि स्मार्ट होम उत्पादनांमध्ये आघाडीवर आहे. Samsung आणि सोनीने नुकताच त्यांचा 8K टीव्ही लाँच केला होता. तर अन्य चीनी कंपन्या 2020 पर्यंत हे टीव्ही लाँच करतील. जर यंदा Huawei ने हा टीव्ही लाँच केला तर बाजारात 5जीला आणखीन प्रसिद्धी मिळेल.