नथिंगने वॉच आणले, बड्सही! चार्जरसह सर्व उत्पादनांची किंमत मात्र ठेवली ४९९९ च्या आत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 17:41 IST2023-09-26T17:41:47+5:302023-09-26T17:41:59+5:30
नथिंग वॉच आणि वायरलेस इअरफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

नथिंगने वॉच आणले, बड्सही! चार्जरसह सर्व उत्पादनांची किंमत मात्र ठेवली ४९९९ च्या आत
CMF by Nothing ने भारतात वेगवेगळी उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये Watch Pro, Buds Pro आणि अॅडॅप्टर आहेत. या सर्व डिव्हाईसेसची किंमत ५००० रुपयांपेक्षा कमी आहे. नथिंग वॉच आणि वायरलेस इअरफोनमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.
नथिंग वॉच प्रोला डार्क ग्रे कलरमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. याची किंमत 4,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर मेटॅलिक ग्रे कलरमध्ये उपलब्ध घड्याळाची किंमत 4,999 रुपये आहे. Nothing Buds Pro 3,499 रुपयांना मिळणार आहे. तर CMF Power 65 GaN चार्जरची किंमत 2,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
ही सर्व उत्पादने फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. नथिंग वॉचची चौकोनी डायल देण्यात आली आहे. 1.96 इंच AMOLED डिस्प्ले आहे. कंपनीने IP68 रेटिंग दिले आहे. 100 पेक्षा जास्त वॉच फेस पर्याय, 110 स्पोर्ट्स मोड, हार्ट रेट मॉनिटर, SpO2 सेन्सर, स्लीप ट्रॅकर, स्ट्रेस मॉनिटर आदींसह ऑल्वेझ ऑन फिचरही देण्यात आले आहे.
TWS इयरफोन्समध्ये एक्टिव नॉइस कैंसलेशन देण्यात आले आहे. 10mm डायनॅमिक ड्रायव्हर सेटअप आहे. याला अल्ट्रा बेस तंत्रज्ञान देण्यात आले आहे. क्लिअर कॉल अल्गोरिदम आणि अँटी-विंड नॉइज सारखी वैशिष्ट्ये आहेत. चार्जिंग केस 460mAh बॅटरी व प्रत्येक इयरबड 55mAh बॅटरी देण्यात आली आहे.