पारदर्शक डिजाईनसह Nothing Ear (1) इयरबड्स लाँच; कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 12:50 PM2021-07-28T12:50:55+5:302021-07-28T12:51:58+5:30

Nothing Ear (1) wireless earbuds unveiled: Nothing आपला पहिला टेक प्रॉडक्ट बाजारात सादर केला आहे. हे TWS earbuds भारतासह जगभरात लाँच करण्यात आले आहेत.  

Nothing ear 1 launched in india specifications features price  | पारदर्शक डिजाईनसह Nothing Ear (1) इयरबड्स लाँच; कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स 

पारदर्शक डिजाईनसह Nothing Ear (1) इयरबड्स लाँच; कमी किंमतीत मिळणार जबरदस्त फीचर्स 

Next

वनप्लसचे सहसंस्थापक Carl Pei यांच्या नवीन कंपनी Nothing ने आपला पहिला टेक प्रोडक्ट Nothing Ear (1)  लाँच केला आहे. या इयरबड्सची जगभरातील किंमत पाहता हे बड्स भारतात स्वस्तात लाँच करण्यात आले आहेत. Nothing Ear (1) भारतात 5,999 रुपयांमध्ये विकत घेता येतील. हे बड्स फ्लिपकार्टवर 17 ऑगस्ट दुपारी 12 वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

Nothing Ear (1) चे फिचर आणि स्पेसिफिकेशन्स  

Nothing इयरबड्सचा काही भाग पारदर्शक ठेवण्यात आला आहे, तसेच याच्या चार्जिंग केसचा वरचा भाग देखील पारदर्शक आहे. ही चार्जिंग केस USB Type-C पोर्ट आणि Qi वायरलेस टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. हे इयरबड्स केसच्या 10 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगसह 8 तास चालू शकतात. केससहNothing Ear (1)  इयरबड्स 34 तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतात.  

Nothing Ear (1) मध्ये अ‍ॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन सपोर्ट मिळतो. या इयरबड्समध्ये टच कंट्रोलने व्हॉल्युम, प्लेबॅक आणि नॉइज कॅन्सलेशन नियंत्रित करता येईल. या बड्सची Equaliser Settings, Fast Pairing, Firmware Updates आणि In-Ear Detection इत्यादी सेटिंग सपोर्टेड अ‍ॅपने बदलता येते. यात दोन इंटेंसिटी मोडस आणि एक ट्रान्स्परन्सी मोड मिळतो. Nothing Ear (1) मध्ये 11.6mm चे डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. कनेक्टिविटीसाठी या इयरबड्समध्ये Bluetooth 5.2 सह SBC आणि AAC Bluetooth codecs सपोर्ट मिळतो. 

Web Title: Nothing ear 1 launched in india specifications features price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.