Nothing Phone 1 खरेदी करणाऱ्यांसोबत धोका? ब्राइटनेस लेव्हल खूपच कमी, युझर्सना पश्चाताप!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 04:27 PM2022-08-12T16:27:18+5:302022-08-12T16:29:03+5:30

Nothing Phone 1 Display: नथिंग ब्रँडच्या पहिल्यावहिल्या फोनची स्मार्टफोन बाजारात खूप चर्चा झाली. हटके डिझाइन, फिचर्स आणि कमी किंमत यामुळे फोन खरेदीसाठी देखील झुंबड उडाली.

nothing phone 1 brightness level is not as same as what company claims says report | Nothing Phone 1 खरेदी करणाऱ्यांसोबत धोका? ब्राइटनेस लेव्हल खूपच कमी, युझर्सना पश्चाताप!

Nothing Phone 1 खरेदी करणाऱ्यांसोबत धोका? ब्राइटनेस लेव्हल खूपच कमी, युझर्सना पश्चाताप!

Next

Nothing Phone 1 Display: नथिंग ब्रँडच्या पहिल्यावहिल्या फोनची स्मार्टफोन बाजारात खूप चर्चा झाली. हटके डिझाइन, फिचर्स आणि कमी किंमत यामुळे फोन खरेदीसाठी देखील झुंबड उडाली. पण आता खरेदीदारांमध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली आहे. युझर्सना फोनशी निगडीत अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे आणि याबाबतच्या तक्रारी युझर्स सोशल मीडियावर करत आहेत. 

Nothing Phone 1 खरेदी केलेल्यांनी अक्षरश: डोक्यावर हात मारला, डिस्प्लेशी निगडीत तक्रारी; पाहा...

नथिंग फोनच्या लॉन्चिंगवेळी कंपनीनं केलेल्या जाहिरातीत या फोनमध्ये ६.५ इंचाची फूल-एचडी प्लस ओएलडी डिस्प्लेसोबत १२०० निट्सचा पीक ब्राइटनेस मिळेल असा दावा केला होता. पण प्रत्यक्षात समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार फोनचा ब्राइटनेस लेव्हल कंपनीनं केलेल्या दाव्यापेक्षा अत्यंत कमी आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार नथिंग फोन १ मध्ये १२०० नव्हे, तर फक्त ७०० निट्सचा पीक ब्राइटनेस लेव्हल देण्यात आला आहे. यासोबत, कंपनी आगामी काळात अपडेट्सद्वारे अतिरिक्त ब्राइटनेस सपोर्ट देऊ शकते असंही नमूद करण्यात आलं आहे. पण आता यावरून प्रश्न निर्माण होतो की लोकांना फसवून ही विक्री करण्यात आली आणि ज्यांनी नथिंग फोन १ विकत घेतला त्यांची फसवणूक झाली आहे का? कारण लोकांनी 1200 निट्स पीक ब्राइटनेस लक्षात घेऊन फोन विकत घेतला आणि तो फक्त 700 निट्सचा निघाला. प्रश्न बरेच आहेत, परंतु, आतापर्यंतच्या अहवालातून केवळ पीक ब्राइटनेस माहिती प्राप्त झाली आहे.

कॉम्प्युटर बेसच्या रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीनुसार फोन फक्त 700 nits पीक ब्राइटनेस सह लॉन्च करण्यात आला आहे, तसेच रिपोर्ट मध्ये असेही म्हटले आहे की कंपनीच्या साइटवरील माहिती देखील बदलण्यात आली आहे. पण जेव्हा आम्ही याची पडताळणी केली तेव्हा आम्हाला Nothing च्या अधिकृत वेबसाइटवर अशी कोणतीही माहिती दिसली नाही. जुलैमध्ये एका जर्मन प्रकाशनानं एक चाचणी केली आणि माहिती मिळाली की फोनचा ब्राइटनेस कधीच 700 nits च्या वर गेलेला नाही. नथिंग कंपनीकडून कॉम्प्युटरबेसकडे पुष्टी केली की फोनमध्ये 700 निट्स ब्राइटनेस आहे जो आगामी काळात अपडेटद्वारे 1200 पर्यंत वाढवणार आहे. 

Web Title: nothing phone 1 brightness level is not as same as what company claims says report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.