Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 06:35 PM2022-07-13T18:35:01+5:302022-07-13T18:36:35+5:30

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला फोन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Nothing Phone 1 Four unique features that the competition does not offer price design all you need to know | Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

Nothing Phone (1): 'नथिंग फोन'ची चार अशी वैशिट्य की जी इतर कोणत्याच स्मार्टफोनमध्ये नाहीत, अगदी iPhone ही फेल!

googlenewsNext

Nothing Phone (1) हा स्मार्टफोन यंदाच्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेला फोन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कंपनीनं आपल्या पहिल्याच स्मार्टफोनमधून अनोख्या डिझाइननं सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास भाग पाडलं आहे. नथिंग फोनचं डिझाइन इतर स्मार्टफोनपेक्षा वेगळं आहेच, पण यातील फिचर्स देखील सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरत आहेत.   

Nothing Phone (1) च्या वैशिष्ट्यांपैकी चार वैशिष्ट्य अशी आहेत की जी या फोनला इतर स्मार्टफोनच्या गोतावळात आगळंवेगळं ठरवतात. याच चार वैशिष्ट्यांची माहिती जाणून घेऊयात...

१. पारदर्शक डिझाइन (Transparent Design)
नथिंग फोन(१) सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे फोनचं डिझाइन हेच आहे. फोनच्या पारदर्शी डिझाइनमुळेच हा फोन इतर फोनपेक्षा वेगळा ठरतो. फोनला ट्रान्सपरंट ग्लासचं बॅक पॅनल दिलं आहे. प्रीमियम फिल येण्यासाठी बॅक पॅनलवर गोरिला ग्लासचं कोटिंग देण्यात आलं आहे. हटके डिझाइनमुळे हा फोन सर्वांचं लक्ष वेधून घेतो. फोन इतका ट्रान्सपरंट आहे की फोनमधील सर्व कम्पोनंट्स बॅक पॅनलमधून दिसतात. 

२. एलइडी लाइट्स  (LED Lights)
नोटिफिकेशन्ससाठी एलईडी लाइट्सचा वापर ही स्मार्टफोनसाठी काही नवी बाब नाही. पण याबाबतही 'नथिंग फोन'नं एक पाऊल पुढे टाकलं आहे. मागील बाजूस अनेक स्ट्रीप्स देण्यात आल्या आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या या स्ट्रीप्समध्ये ९०० पेक्षा जास्त LEDs आहेत, ज्या युझरला कॉल किंवा मेसेज आल्यावर किंवा फोन चार्ज होत असताना उजळून दिसतात. फोनमध्ये एक लहान लाल LED लाइट देखील आहे युझर व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना ही लाइट पेटते. याशिवाय, युझर्सला LED लाइट्स त्याच्या मर्जीनुसार अॅडजस्ट करू शकतात. याला ग्लिफ इंटरफेस असंही म्हणता येईल. म्हणजेच तुम्हाला एखादा कॉल किंवा नोटिफिकेश येत असेल तर केवळ फोनमागील लाइट्समधून तुम्हाला याची पूर्वसूचना मिळू शकणार आहे.

३. वायरलेस चार्जिंग (Wireless charging)
वायरलेस चार्जिंग सपोर्ट असलेले ४०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीचे फोन बाजारात उपलब्ध नाहीत. पण त्याचवेळी नथिंग फोन कंपनीनं आपल्या पहिल्याच स्मार्टफोनची किंमत बेस मॉडेलसाठी ३२,९९९ रुपये इतकी ठेवली आहे. विशेष म्हणजे यात वायरलेस चार्जिंग सपोर्टही उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. फोन फक्त 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत असला तरी वायर्ड चार्जिंगसाठी हा एक चांगला पर्याय आहे. उदाहरणार्थ, तुमच्या कारमध्ये वायरलेस चार्जिंग पॅड असल्यास, तुम्ही तुमच्या प्रवासात फोनची 4500 mAh बॅटरी चार्ज करू शकता. 

४. रिसायकल अ‍ॅल्युमिनिअम फ्रेम (Recycled aluminium frame)
बाजारात ३० हजार रुपयांच्या किमतीत अ‍ॅल्युमिनिअम फ्रेम असलेला फोन उपलब्ध नाही. 'नथिंग फोन'मध्ये केवळ फ्रेमच नाही तर इतर पार्टसाठीही रिसायकल अ‍ॅल्युमिनिअम वापरण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर फोनचा बॉक्स देखील रिसायकल सामग्रीपासून बनवण्यात आलेला आहे.

Web Title: Nothing Phone 1 Four unique features that the competition does not offer price design all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.