२९९९ रुपयांत होतेय Nothing Phone 1 ची तुफान विक्री, केवळ अशाप्रकारे मिळेल ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 12:41 PM2023-04-04T12:41:50+5:302023-04-04T12:43:29+5:30

पाहा तुम्हाला कसा खरेदी करता येईल हा स्मार्टफोन.

Nothing Phone 1 is on sale at Rs 2999 this is the only way to get this offer flipkar online shopping portal exchange offer | २९९९ रुपयांत होतेय Nothing Phone 1 ची तुफान विक्री, केवळ अशाप्रकारे मिळेल ऑफर

२९९९ रुपयांत होतेय Nothing Phone 1 ची तुफान विक्री, केवळ अशाप्रकारे मिळेल ऑफर

googlenewsNext

ऑनलाइन शॉपिंग पोर्टल फ्लिपकार्टवर (Flipkart) Nothing Phone 1 वर मोठी सूट दिली जात आहे. नथिंग फोन 1 गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणारा हा स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे. डिस्काउंटनंतर आता हा फोन भारतीय बाजारपेठेत अतिशय स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या फोनवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.

नथिंग फोन 1 चे 8 जीबी रॅम / 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट सध्या फ्लिपकार्टवर सवलतीनंतर 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. दरम्यान, ग्राहकांनी Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यावर 5 टक्के ऑफर दिली जाईल. तुम्ही हा स्मार्टफोन EMI वरदेखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दरमहा 1,026 रुपये द्यावे लागतील. यासोबतच 27,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू घेतल्यावर तुम्हाला हा फोन फक्त 2,999 रुपयांना मिळेल.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स?
नथिंग फोन 1 मध्ये 6.55-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आलाय, ज्याचं रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल, 20:9 आस्पेक्ट रेशो आणि 120Hz चा रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 12 वर आधारित असून तो नथिंग ओएसवर काम करतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर, या स्मार्टफोनमध्ये Octa Core Qualcomm SM7325-AE Snapdragon 778G+ 5G (6 nm) प्रोसेसर देण्यात आलाय. हा स्मार्टफोन 8GB आणि 128GB स्टोरेज, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Nothing Phone 1 is on sale at Rs 2999 this is the only way to get this offer flipkar online shopping portal exchange offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.