जुन्या कर्मचाऱ्याची कंपनी घेणार वनप्लसशी पंगा; Nothing Phone 1 ची लाँच डेट आली समोर 

By सिद्धेश जाधव | Published: June 1, 2022 12:07 PM2022-06-01T12:07:51+5:302022-06-01T12:08:11+5:30

Nothing Phone 1 स्मार्टफोनच्या लाँच डेटची माहिती लीक झाली आहे.  

Nothing Phone 1 Official Launch Date To Be Revealed Soon Check Leak Specifications And Features  | जुन्या कर्मचाऱ्याची कंपनी घेणार वनप्लसशी पंगा; Nothing Phone 1 ची लाँच डेट आली समोर 

जुन्या कर्मचाऱ्याची कंपनी घेणार वनप्लसशी पंगा; Nothing Phone 1 ची लाँच डेट आली समोर 

Next

वनप्लसचे सह-संस्थापक Carl Pei यांनी आपली नवीन कंपनी Nothing सुरु करून काही वर्ष झाली आहेत. कंपनीनं आपले इयरबड्स बाजारात सादर केले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी Nothing Phone 1 ची घोषणा देखील करण्यात आली आहे. आता कंपनीनं पुन्हा एकदा या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची आठवण करून दिली आहे, तसेच ऑनलाईन लिक्समधून लाँच डेटची माहिती देखील समोर आली आहे.  

Nothing Phone 1 चे कंपनीनं सांगितलेले फीचर्स  

Nothing नं ट्विटरवरून सांगितले आहे की Nothing Phone 1 मध्ये ट्रान्सपरंट बॅक पॅनल असेल. जी काचेची असू शकते कारण कंपनी फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देत आहे. तसेच या फोनमध्ये रिसायकल अ‍ॅल्युमिनियमपासून बनवण्यात आलेल्या फ्रेमचा वापर करण्यात येईल. होगा. यात Qualcomm Snapdragon प्रोसेसर लगा होगा. 

कंपनीच्या ट्वीटनुसार या स्मार्टफोनमध्ये चिन अर्थात स्क्रीनच्या खालच्या बाजूला असलेला अतिरिक्त काळा भाग नसेल. म्हणजे फोनमध्ये खूप बारीक बेझल असतील. हा डिवाइस भारतात फ्लिपकार्टच्या माध्यमातून विकला जाईल. कंपनीने आपल्या ट्वीटमध्ये असे देखील सांगितले आहे की या डिवाइसची लाँच डेट लवकरच सांगितली जाईल.  

संभाव्य लाँच डेट  

या महिन्यात आलेल्या लीकनुसार आगामी Nothing स्मार्टफोन 21 जुलै 2022 ला लाँच केला जाईल. तसेच रिपोर्टमधून फोनची किंमत देखील समजली आहे. हा फोन 500 यूरो (जवळपास 41,000 रुपये) मध्ये सादर केला जाऊ शकतो.  

Nothing Phone 1 चे संभाव्य स्पेक्स  

एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 1 मध्ये 6.43 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 128GB स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Nothing OS वर चालेल.  

या फोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nothing Phone 1 मध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. 

Web Title: Nothing Phone 1 Official Launch Date To Be Revealed Soon Check Leak Specifications And Features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.