स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?  

By सिद्धेश जाधव | Published: June 8, 2022 05:16 PM2022-06-08T17:16:26+5:302022-06-08T17:17:24+5:30

Nothing Phone 1 च्या ऑफिशियल लाँचची तारीख सांगण्यात आली आहे.  

Nothing phone 1 will officially launch on 12 july 2022   | स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?  

स्मार्टफोन इंडस्ट्रीमध्ये नव्या खेळाडूची एंट्री; थेट आयफोनला टक्कर देणार अँड्रॉइडचा शिलेदार?  

googlenewsNext

वनप्लसचे सह सह-संस्थापक कार्ल पे यांनी नवीन कंपनी सुरु केल्यापासून ज्या फोनची वाट बघितली जात आहे. त्या स्मार्टफोनची लाँच डेट आज समजली आहे. Nothing Phone 1 पुढील महिन्यात 12 जुलैला संध्याकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी ग्राहकांच्या भेटीला येईल. नथिंगनं आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून याची लाँच डेट कंफर्म केली आहे.  

एप्रिल मधेच हा स्मार्टफोन ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर लिस्ट करण्यात आला आहे. तिथे हा हँडसेट “Coming Soon” कॅटेगरीमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन Qualcomm च्या कस्टमाइज्ड प्रोसेसर, Android 12 वर आधारित Nothing OS सह येईल. काही दिवसांपूर्वी या डिवाइसच्या डिस्प्लेची माहिती देण्यात आली आहे. आता कंपनीनं फोनची लाँच डेट सांगितली आहे.  

Nothing Phone 1 चे संभाव्य स्पेक्स  

एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, Nothing Phone 1 मध्ये 6.55 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले मिळू शकतो, जो 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. फोनचा डिस्प्ले HDR10+ सपोर्टसह येऊ शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसरसह येईल, ज्यात 8GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 128GB स्टोरेज मिळू शकते. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित Nothing OS वर चालेल.  

या फोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल. त्याचबरोबर 8MP ची वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Nothing Phone 1 मध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळेल. विशेष म्हणजे या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग दिली जाऊ शकते. 

Web Title: Nothing phone 1 will officially launch on 12 july 2022  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.