आणखी एका कंपनीचे स्मार्टफोन भारतात बनू लागले; नथिंग फोन (३ए) लवकरच लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 14:14 IST2025-02-10T14:14:12+5:302025-02-10T14:14:26+5:30

भारत आता हळूहळू स्मार्टफोन बनविण्याचा हब बनत चालला आहे. अॅप्पलही आता भारतात फोन तयार करत आहे.

Nothing Phone 3a Release Date, Price in India: Another company's smartphones are being made in India; Nothing Phone (3A) will be launched soon | आणखी एका कंपनीचे स्मार्टफोन भारतात बनू लागले; नथिंग फोन (३ए) लवकरच लाँच होणार

आणखी एका कंपनीचे स्मार्टफोन भारतात बनू लागले; नथिंग फोन (३ए) लवकरच लाँच होणार

अॅप्पलसारख्या ब्रँडला टक्कर देणाऱ्या इनोव्हेटिंव कंपनी नथिंगचा नथिंग फोन (३ए) सिरीज लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा फोन भारतातच बनविण्यात आला आहे. चेन्नई येथील फॅक्टरीमध्ये नथिंगचे बनत असून यामुळे ५०० जणांना रोजगार उपलब्ध झाल्याचे कंपनीने सांगितले आहे. तसेच यापैकी ९५% कर्मचारी महिला आहेत. 

भारत आता हळूहळू स्मार्टफोन बनविण्याचा हब बनत चालला आहे. अॅप्पलही आता भारतात फोन तयार करत आहे. याचा विस्तारही केला जात आहे. केंद्राच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाशी नथिंगनेही मिळते जुळते घेण्यास सुरुवात केली आहे. 

नथिंग ही लंडनस्थित तंत्रज्ञान कंपनी आहे. ट्रान्स्परंट डिझाईनसाठी ही कंपनी ओळखली जाते. प्रिमिअम स्मार्टफोन, बजेटमधील स्मार्टफोन असले तरीही ते ट्रान्स्परंट असतात. त्याला एक वेगळ्याच एलईडी लाईटचे वर्क असते. यामुळे हे फोन इतर फोनपेक्षा वेगळे ठरत आहेत. नथिंगने बंगळुरू, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि चेन्नईमध्ये पाच प्रायोरिटी डेस्क उभारले असून विविध ब्रँडसोबत असलेली ३०० सर्व्हिस सेंटर देखील देशभरात उघडली आहेत. 

Nothing Phone (3a) सिरीज ही लंडनमध्ये डिझाईन केली गेली आहे. 2020 मध्ये या कंपनीची स्थापना केली गेली होती. या नव्या सिरीजची लाँचिंग ४ मार्चला करण्यात येणार आहे. या मिड रेंज स्मार्टफोनची किंमत २४-२६ हजार रुपये असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये 6.8-inch OLED display, Snapdragon 7s Gen 3 chipset, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज असण्याची शक्यता आहे. तसेच 6,000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. 

या फोनचा कॅमेरा ५० मेगापिक्सलचा टेलिफोटो लेन्स आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड लेन्स तसेच 32MP सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. 

Web Title: Nothing Phone 3a Release Date, Price in India: Another company's smartphones are being made in India; Nothing Phone (3A) will be launched soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.