Aadhaar Card Update : लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या 'या' App द्वारे करा Aadhaar अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 04:06 PM2022-07-20T16:06:20+5:302022-07-20T16:07:06+5:30

Aadhaar Card Update : जर तुमच्या आधार कार्डमधील नाव आणि पत्त्याशी संबंधित तपशील चुकीचा असेल तर आता तुम्ही घरबसल्या सहजपणे दुरुस्त करू शकता.

now change your name and address in aadhaar card with maadhaar app know step by step process google play app store | Aadhaar Card Update : लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या 'या' App द्वारे करा Aadhaar अपडेट

Aadhaar Card Update : लाईनमध्ये उभं राहण्याची गरज नाही, घरबसल्या 'या' App द्वारे करा Aadhaar अपडेट

googlenewsNext

Aadhaar Card Update : आधार कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी आता आधार कार्डाची गरज भासते. यासाठीच आधार कार्डावर असणारी सर्व माहिती योग्य आणि अचूक असणं आवश्यक आहे. अनेक वेळा घाईघाईने लोक आधार कार्डमध्ये चुकीचा तपशील टाकतात, ज्यामुळे त्यांना नंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जर तुमच्या आधार कार्डमधील नाव आणि पत्त्याशी संबंधित तपशील चुकीचा असेल तर आता तुम्ही घरबसल्या सहजपणे दुरुस्त करू शकता. हे काम तुम्ही mAadhaar अॅपद्वारे करू शकता.

अॅपद्वारे नाव, पत्ता, जन्मतारीख संबंधित तपशील दुरुस्त करणे खूप सोपे आहे आणि काही मिनिटांमध्ये हे शक्य आहे. घरबसल्या mAadhaar अॅपद्वारे तुम्ही नाव आणि पत्ता तपशील कसा अपडेट करता येईल हे पाहुया.

कसं कराल अपडेट?
यासाठी प्रथम तुम्हाला प्ले स्टोअर किंवा ऍपल स्टोअरवरून mAadhaarApp डाउनलोड करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही खालील लिंक्सवर क्लिक करून थेट डाउनलोड देखील करू शकता. 

येथून mAadhaar अॅप डाउनलोड करा
https://tinyurl.com/yx32kkeq (Android) 
https://tinyurl.com/taj87tg (iOS)

यानंतर तुम्हाला रजिस्टर माय आधारवर क्लिक करून तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी मिळेल. ओटीपी टाकल्यानंतर तुम्ही अॅपमध्ये लॉग इन व्हाल.

लॉग इन केल्यानंतर, तुम्हाला अॅपमध्ये तुमचा आधार दिसेल, जिथे तुम्हाला तुमचे नाव आणि तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे ४ अंक दिसतील.

यानंतर तुम्ही My Aadhaar वर क्लिक करा. इथे तुम्हाला Aadhaar Update चा कॉलम दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्हाला captcha टाकावा लागेल आणि Request OTP वर क्लिक करावे लागेल.

OTP प्राप्त झाल्यानंतर, तुमच्याकडे अपडेट विंडो उघडेल जिथे तुम्ही नाव आणि पत्ता बदलून सबमिट करू शकता. दरम्यान, प्रत्येक अपडेटसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाईल.

Web Title: now change your name and address in aadhaar card with maadhaar app know step by step process google play app store

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.