आता चार्जिंगचं टेन्शन खल्लास, बाजारात आलीय 'सोलर पॉवर बँक'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 11:25 AM2018-11-22T11:25:35+5:302018-11-22T11:28:47+5:30

UBON SL-6067 ही पॉवर बँक दोन रंगात उपलब्ध असून काळा आणि पांढरा असेच त्याचे वर्गीकरण आहे.

Now the charging tension will be seen, the 'Solar Power Bank' | आता चार्जिंगचं टेन्शन खल्लास, बाजारात आलीय 'सोलर पॉवर बँक'

आता चार्जिंगचं टेन्शन खल्लास, बाजारात आलीय 'सोलर पॉवर बँक'

Next

मुंबई - सध्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर गरजेचा बनला आहे.  त्यामुळे स्मार्टफोन युजर्संची संख्याही झपाट्याने वाढताना दिसत आहे. मात्र, इंटरनेट वापरामुळे मोबाईल चार्जिंग ही अत्यंत गंभीर समस्या बनली आहे. त्यामुळेच, पॉवर बँकचा वापरही वाढला आहे. पण, आता सोलवर चालणारी पॉवर बँक बाजारात आली आहे. Ubon कंपनीने ही सोलर पॉवर बँक लाँच केली असून त्याची किंमत 1299 रुपये एवढी आहे. 

UBON SL-6067 ही पॉवर बँक दोन रंगात उपलब्ध असून काळा आणि पांढरा असेच त्याचे वर्गीकरण आहे. विशेष म्हणजे ई कॉमर्स वेबसाईटवरुनही ही पॉवर बँक ग्राहकांना खेरदी करता येणार आहे. या पॉवर बँकला सिंगल आऊटपूट पोर्ट असून त्यासोबतच एक वायर जोडलेली आहे. तसेच त्यास V8 सॉकेट आणि युएसबी डॉकही देण्यात आले आहे. या पॉवर बँकेसाठी प्लॅस्टीक बॉडीचा वापर करण्यात आला असून 10 वॅट पॉवरची क्षमता आहे. तसेच ग्राहकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे. ओव्हरहोल्टेज प्रोटेक्शन, ड्यअल सेफ्टी सर्किट, ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन, ओव्हरचार्ज आणि डिसचार्ज प्रोटेक्शन आणि सोबतच ब्लू चार्जिंग इंडिकेटर देण्यात आले आहे. या पॉवर बँकसोबत ग्राहकांना 1 वर्षांची वॉरंटी देण्यात आली आहे. 

दरम्यान, UBON कंपनीचे सह-संस्थापक मनदीप अरोरा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, SL-6067 या पॉवर बँकची निर्मित्ती, जे सातत्याने घराबाहेर असतात, विशेषत: सूर्यप्रकाशात असतात आणि त्यांच्या मोबाईलसाठी चार्जिंगची अधिक आवश्यकता असते, अशां लक्षात घेऊन करण्यात आली आहे.
 

Web Title: Now the charging tension will be seen, the 'Solar Power Bank'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.