आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 04:26 PM2022-05-23T16:26:02+5:302022-05-24T12:58:39+5:30

Whatsapp : सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे.

now downloaded dl and pan card on whatsapp new digilocker feature arrived | आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम

आता Whatsapp वर डाउनलोड होणार DL आणि PAN कार्ड; फक्त एका मेसेजमुळे होईल काम

googlenewsNext

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) युजर्ससाठी खास सुविधा सुरू केली आहे. आता तुम्ही फक्त एका व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड आणि आरसी यासारखे आवश्यक डॉक्युमेंट्स डाऊनलोड करू शकता. सरकारने डिजिलॉकर (Digilocker) सर्व्हिसला अ‍ॅक्सेस करण्यासाठी MyGov Helpdesk ला व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध केले आहे. म्हणजेच तुम्ही फक्त एका नंबरवर व्हॉट्सअप मेसेज पाठवून Digilocker सर्व्हिस वापर करू शकता. 

'हे' डॉक्युमेंट्स करू शकता डाउनलोड ...
- पॅनकार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- सीबीएसई दहावी पास सर्टिफिकेट
- आरसी बुक
-  विमा पॉलिसी - दुचाकी
- दहावीचे मार्कशीट
- बारावीचे मार्कशीट
- विमा पॉलिसी डॉक्युमेंट्स (Digilocker वर उपलब्ध जीवन आणि गैर-जीवन)

WhatsApp वर असे करा डाउनलोड आपले डॉक्युमेंट्स...
- यासाठी तुम्हाला फक्त +91 9013151515 नंबरवर  Namaste किंवा Hi किंवा Digilocker लिहून पाठवावे लागेल. 
- यानंतर तुम्हाला DigiLocker अकाउंट किंवा Cowin सर्व्हिस अ‍ॅक्सेस करायचे की नाही हे विचारले जाईल.
- DigiLocker निवडल्यावर तुम्हाला विचारले जाईल की खाते आहे की नाही.
- जर DigiLocker वर तुमचे आधीच अकाउंट असल्यास, तुमचा आधार नंबर टाका.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल, तो एंटर करा.
- आता तुम्ही जी काही कागदपत्रे आधीच अपलोड केली आहेत, ती तुम्ही येथून डाउनलोड करू शकता.

दरम्यान, MyGov हेल्पडेस्क (ज्याला आधी MyGov कोरोना हेल्पडेस्क म्हणून ओळखले जात होते) मार्च 2020 मध्ये सुरू करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात या हेल्पडेस्कने लोकांना कोविडशी संबंधित माहिती देण्यापासून, लस बुकिंगची सुविधा, प्रमाणपत्र डाउनलोड करण्यापर्यंत खूप मदत केली आहे. आजपर्यंत 80 मिलियनहून अधिक लोकांनी हेल्पडेस्कवर अ‍ॅक्सेस केला आहे आणि 33 मिलियनहून अधिक लस प्रमाणपत्रे डाउनलोड करण्यात आली आहेत.

Web Title: now downloaded dl and pan card on whatsapp new digilocker feature arrived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.