आता फेसबुकचीही 'आधार'सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 05:05 PM2017-12-27T17:05:17+5:302017-12-27T17:07:37+5:30
बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे.
मुंबई - बँक खातं, पॅन कार्ड आणि मोबाईल क्रमांकासह सर्वच महत्वाच्या ठिकाणांवर आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये आता फेसबुकची भर पडली आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, फेक अकाऊंटला आळा घालण्यासाठी फेसबुक आधारसक्ती करु शकते. भारतामध्ये फेसबुकवर नवीन खातं उघण्यासाठी सध्या आधारची माहिती विचारली जात असल्याचे समोर आलं आहे. लवकरच जुन्या वापरकर्त्यांनाही फेसबुक आधारसक्ती करु शकते. नागरिकांना सर्वमान्य ओळख मिळवून देण्यासाठी सरकारनं 'युनिक आयडेंटिफिकेशन नंबर' अर्थात आधार कार्ड आमंलात आणलं होतं.
'आधारकार्डवर जे तुमचं नाव आहे. तेच नाव फेसबुकवर खातं उघडताना नाव टाका, जेणेकरुन तुमचे मित्र-मैत्रीणी तुम्हाला सहजपणे शोधू शकतील. अशा पद्धतीचा मेसेज नवीन खातं उघडताना फेसबुककडून येतोय.
दरम्यान, फेसबुककडून हा मेसेज फक्त रेडिट वापरकर्त्यांना आला आहे. मोबाइल साईटवर हा मेसेज येण्याच प्रमाण जास्त आहे. दरम्यान, फेसबुकनं दिलेल्या स्पष्टीकरणात त्यांनी असं स्पष्ट केलं आहे की, फेसबुक वापरासासाठी आधारकार्ड अनिवार्य करण्यात आलेलं नाही. वापरकर्त्यांनी फेसबुक आपल्या वास्तविक नावाप्रमाणे वापरावं. हा त्यामागील उद्देश आहे.
फेसबुकचे सध्या जगभरात 2 बिलियन वापरकर्ते आहेत. भारतामध्ये बेसबुक वापराचं प्रमाण इतर देशांच्या तुलनेत आधिक आहे. भारतामध्ये 240 मिलियन फेसबुक युजर्स आहेत.
फेसबुक मॅसेंजरची मुसंडी, युजर्संची संख्या झाली 170 कोटी
फेसबुक मॅसेंजर अॅपचे एकूण १३० कोटी डाऊनलोड झाले असून उर्वरित युजर्स संगणकावरून याचा वापर करत असल्याचं कंपनीतर्फे जाहीर करण्यात आलं आहे. फेसबुक मॅसेंजरला आधी स्वतंत्र अस्तित्व नव्हते. २००८ साली याला फेसबुक चॅट नावाने लाँच करण्यात आलं होतं. प्रारंभी याला फक्त वेबवर वापरता येत होतं. यानंतर अँड्रॉइड व आयओएस प्रणालीसाठी याला सादर करण्यात आले. अलीकडेच फेसबुकने खास मुलांसाठी स्वतंत्र मॅसेंजर लाँच केला आहे. या पार्श्वभूमिवर, आता हा मॅसेंजर तब्बल १.७ अब्ज म्हणजेच १७० कोटी युजर्स वापरत असल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे.