कोणत्याही भागात मिळवा सुपरफास्ट इंटरनेट, Elon Musk यांच्या SpaceX कंपनीची मोठी घोषणा...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 02:23 PM2024-06-23T14:23:58+5:302024-06-23T14:24:35+5:30
SpaceX कंपनीच्या Starlink ने एक खास प्रोडक्ट लॉन्च केले आहे.
Elon Musk यांच्या मालकीच्या SpaceX कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने आपले बहुप्रतिक्षित Starlink Mini डिव्हाईस लॉन्च केले आहे. हा एक अतिशय लहान आकाराचा सॅटेलाईट इंटरनेट अँटिना आहे. याला तुम्ही आपल्या बॅगेत टाकून कुठेही घेऊन जाऊ शकता आणि याद्वारे कुठल्याही भागात सुपरफास्ट इंटरनेट मिळवू शकता. या सॅटेलाईट अँटिनामध्ये इनबिल्ट वायफाय सपोर्ट आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन किंवा लॅपटॉप कनेक्ट करू शकता.
@Starlink Mini with integrated WiFi (puppy not included). Ramping production and will be available in international markets soon. pic.twitter.com/VuXO96rx9U
— Michael Nicolls (@michaelnicollsx) June 20, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, या Starlink Mini kit ची किंमत 599 अमेरिकन डॉलर (भारतीय रु. 50,054) आहे. Starlink चे ग्राहक Mini Roam service घेऊ शकतात. परंतू, कंपनीने सध्या यात लिमिटेड डेटा दिला आहे. म्हणजेच, ग्राहकाला महिन्याला फक्त 50GB डेटा मिळेल. भविष्यात ही लिमिट वाढवली जाऊ शकते.
SpaceX च्या स्टारलिंक व्हीपीने दिली माहिती
SpaceX च्या स्टारलिंक इंजीनियरिंगचे व्हीव्ही माइकल निकोलने X प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली. तसेच, लवकरच हे डिव्हाईस आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू होणार असल्याचे सांगितले.
Starlink Mini चे वजन आणि स्पीड
Starlink Mini चे वजन फक्त 1.13 किलोग्राम आहे. कंपनीच्या स्टँडर्ड डिशच्या तुलनेत हे 60 टक्के हलके आहे. या सर्व्हिस अंतर्गत सध्या 100 Mbps ची स्पीड मिळेल. भविष्यात ही स्पीड वाढवली जाऊ शकते.
2019 में Starlink ची सुरुवात
SpaceX ही इलॉनम मस्क यांची कंपनी आहे. ही कंपनी अंतराळात जाणाऱ्या स्पेसफ्रॉटसाठी रॉकेट लॉन्चर आणि इतर सामान बनवण्याचे काम करते. SpaceX ने 2019 मध्ये Starlink ची सुरुवात केली होती. याद्वारे कंपनी सॅटेलाईटवर आधारिक इंटरनेट सेवा पुरवते. आतापर्यंत कंपनीने 6 हजारांपेक्षा जास्त सॅटेलाईट अंतराळात पाठवल्या आहेत. सध्या जगभरात याचे 30 लाख ग्राहक असून, 100 पेक्षा जास्त देशांमध्ये सेवा सुरू आहे.