टोल टॅक्स झाला फ्री! एकही रुपया न देता करा प्रवास, Google मॅपचं 'हे' फीचर करेल हजारोंची बचत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 02:35 PM2022-04-06T14:35:55+5:302022-04-06T14:37:18+5:30
हे फीचर अत्यंत उपयुक्त असून आपल्यालाही प्रचंड आवडेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे फीचर आणि त्याची खासियत.
नवी दिल्ली - आपण प्रवासादरम्यान टोल प्लाझावर टॅक्स देऊन थकला असाल आणि यापासून आपल्याला सुटका हवी असेल, हजारो रुपये वाचवायचे असतील, तर आता गुगल मॅपने आपल्यासाठी एक जबरदस्त गिफ्ट आणले आहे. हे फीचर अत्यंत उपयुक्त असून आपल्यालाही प्रचंड आवडेल. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे फीचर आणि त्याची खासियत.
Google Maps ने एक अत्यंत जबरदस्त अपडेट आणले आहे, यामुळे आपल्याला टोल प्लाझावर जाण्यापूर्वीच, त्यावर द्यावा लागणारा टॅक्स चेक करता येणार आहे. यामुळे आपण त्या मार्गाने जायचे की नाही, हे ठरवू शकता. यामुळे तुमचे टोलचे पैसे वाचवू शकतात.
आता जर आपण विचार करत असाल, की टोलवरून जायचे नाही, तर मग कसे जायचे? तर अशा वेळी आपण गुगलला मार्ग बदलण्यासही सांगू शकता, ज्यामुळे आपण आपल्या ठिकाणापर्यंत टोल न देताही पोहोचू शकता.