आता चार जीबी रॅमसह येणार लेनोव्हो के ८ प्लस 

By शेखर पाटील | Published: September 21, 2017 06:42 PM2017-09-21T18:42:57+5:302017-09-21T18:46:43+5:30

लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे.

Now Lenovo's 8 Plus will have a 4 GB RAM | आता चार जीबी रॅमसह येणार लेनोव्हो के ८ प्लस 

आता चार जीबी रॅमसह येणार लेनोव्हो के ८ प्लस 

Next
ठळक मुद्देलेनोव्हो कंपनीने अलीकडेच लेनोव्होे के ८ प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला होताया मॉडेलमध्ये यात तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले होतेआता याचे चार जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे नवीन व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहे

लेनोव्हो कंपनीने लेनोव्होे के ८ प्लस या मॉडेलची चार जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोअरेज असणारी नवीन आवृत्ती भारतीय बाजारपेठेत १०,९९९ रूपये मूल्यात सादर केली आहे.

लेनोव्हो कंपनीने अलीकडेच लेनोव्होे के ८ प्लस हा स्मार्टफोन ग्राहकांना सादर केला होता. या मॉडेलमध्ये यात तीन जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले होते. आता याचे चार जीबी रॅम आणि ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असणारे नवीन व्हेरियंट ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. हे स्टोअरेज मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील उर्वरित बहुतांश फिचर्स हे आधीप्रमाणेच असतील. अर्थात या स्मार्टफोनमध्ये ऑक्टॉ-कोअर मीडियाटेक हेलिओ एक्स २५ हा प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे. 

लेनोव्हो के ८ प्लसच्या या आवृत्तीमध्ये फुल एचडी क्षमतेचा (१०८० बाय १९२० पिक्सल्स) आणि ५.२ इंच आकारमानाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन ड्युअल कॅमेर्‍याने युक्त आहे. याच्या मागील बाजूस १३ आणि ५ मेगापिक्सल्स क्षमतांचे ड्युअल कॅमेरे असून यातील पहिल्यात प्युअरसेल प्लस सेन्सर तर दुसर्‍यात डेप्थ सेन्सर असेल. यात छायाचित्रांना ‘बोके इफेक्ट’ प्रदान करण्याची सुविधा दिलेली आहे. यात‘प्रोफेशनल मोड’, ‘डेप्थ मोड’ तसेच एलईडी फ्लॅश हे फिचर्स असतील. तर यात ८४ अंशातील अँगलसह ८ मेगापिक्सल्स क्षमतेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात प्रो आणि ब्युटी मोड या फिचर्ससह पार्टी फ्लॅशची सुविधादेखील देण्यात आलीआहे.

लेनोव्हो के ८ प्लस हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट ७.१.१ या आवृत्तीवर चालणारे असेल. या स्मार्टफोनमध्ये टर्बो चार्जींगच्या सुविधेने सज्ज असणारी ४,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर दोन दिवसांपर्यंत चालत असल्याचा कंपनीचा दावा आहे. लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ असून यात डॉल्बी अ‍ॅटमॉस, ‘थिएटर मॅक्स’ आदी प्रणाली दिलेल्या आहेत. तर या स्मार्टफोनमध्ये स्वतंत्र ‘म्युझिक की’ देण्यात आली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असून अन्य फिचर्समध्ये ब्ल्यु-टुथ, वाय-फाय, जीपीएस, फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले आहे.   

Web Title: Now Lenovo's 8 Plus will have a 4 GB RAM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.