व्हाटसअॅपवर आता कोणत्याही प्रकारच्या फाईल करा शेअर
By शेखर पाटील | Published: July 24, 2017 12:07 PM2017-07-24T12:07:37+5:302017-07-25T16:30:59+5:30
व्हाटसअॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून आधी बीटा आवृत्तीसाठी असणारे हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले आहे.
व्हाटसअॅपवर आता सर्व प्रकारच्या फाईल्स शेअर करण्याची सुविधा देण्यात आली असून आधी बीटा आवृत्तीसाठी असणारे हे फिचर सर्व युजर्सला देण्यात आले आहे.
व्हाटसअॅपवर सध्या कुणीही युजर सीएसव्ही, डॉक, डॉक्स, पीडीएफ, पीपीटी, पीपीटीएक्स, आरटीएफ, टीएक्सटी, एक्सएलएस, एक्सएलएसएक्स, एमपी ४, एव्हीआय तसेच जीआयएफ अॅनिमेशन फाईल्स वापरू शकतो. काही थर्ड पार्टी अॅप्लीकेशन्सच्या (उदा. डब्ल्यूएफएस) मदतीने मर्यादीत प्रमाणात अन्य प्रकारच्या फाईल्स पाठविता येतात. आता मात्र कोणत्याही फॉर्मेटमधील फाईल व्हाटसअॅपच्या माध्यमातून शेअर करता येईल. मात्र यासाठी आयओएसवर १२४, अँड्रॉइडवर १०० तर व्हाटसअॅप वेबवर ६४ मेगाबाईटपर्यंतच्या फाईल्सच फक्त शेअर करता येणार आहेत. आधी हे फिचर फक्त अँड्रॉइडची बाटी आवृत्ती वापरणार्यांना देण्यात आले होते. आता मात्र अँड्रॉइड व आयओएस युजर्सला ही सुविधा मिळाली आहे.
व्हाटसअॅपने याशिवाय आता एकापेक्षा जास्त प्रतिमा वा व्हिडीओ हे अल्बमच्या स्वरूपात वैयक्तीक चॅट अथवा ग्रुपमध्ये शेअर करण्याची सुविधा दिली आहे. याआधी कुणीही युजर एकावेळी एकच इमेज अथवा व्हिडीओ शेअर करू शकत होता. मात्र आता अल्बमच्या स्वरूपातील मल्टी-शेअरिंगचे फिचर देण्यात आल्यामुळे ते अधिक आकर्षक आणि एकत्रीतपणे शेअर करता येतील. सर्वात महत्वाचे म्हणजे व्हाटसअॅपच्या नेव्हिगेशनमध्ये असणार्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून आपण आपल्या अॅपमधील सर्व छायाचित्रे आणि व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहू शकणार आहोत.