आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:24 PM2021-12-15T12:24:12+5:302021-12-15T12:24:33+5:30

हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्याही सहजपणे प्राप्त करू शकतो. यासाठी गरज आहे ती स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढीच.

Now you can get the coronavirus vaccination certificate on WhatsApp sitting at home | आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

Next

प्रसाद ताम्हनकर
सध्या कोरोनाच्या नव्या अवताराने जगाला धडकी भरवली आहे. जगभरातील लहान मोठे देश कोरोनाच्या या नव्या अवताराचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबवत आहेत. भारतातील केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनीही आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी काही कठोर नियमांचा अवलंब करण्यास नागरिकांना सांगितले आहे.

आजवर भारतात १३३ कोटी लोकांचे लसीकरण (किमान एक मात्रा)  पूर्ण झाले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न चालू आहेत जोडीलाच काही बंधनेही लादण्यात आली आहेत. यापुढे तुम्हाला एखाद्या मॉलमध्ये अथवा चित्रपटगृह, नाट्यमंदिराला भेट देण्यासाठी किंवा सरकारी वाहतूकसेवा, रेल्वे, विमान प्रवास यांचा लाभ घेण्यासाठी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र (Covid-19 Vaccination Certificate) आवश्यक करण्यात आले आहे.

हे लसीकरणाचे प्रमाणपत्र आपण घरबसल्याही सहजपणे प्राप्त करू शकतो. यासाठी गरज आहे ती स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शन एवढीच. तुमच्या एक किंवा दोन लसीकरण पूर्ण झाल्याचे असे दोन्ही प्रमाणपत्र तुम्ही इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त ९०१३१५१५१५ हा मोबाईल क्रमांक तुमच्या मोबाइलमध्ये सेव्ह करायचा आहे.

एकदा हा नंबर सेव्ह झाला की, त्या नंबरवर व्हॉट्सॲपच्या माध्यमातून Certificate असा शब्द टाइप करून पाठवायचा आहे. ज्या मोबाइल नंबरवरून तुम्ही हा मेसेज पाठवणार आहात, तो नंबर लसीकरणाच्या वेळी रजिस्टर केलेला असणे आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. एकदा हा मेसेज तुमच्या नंबरवरून गेला की, काही वेळातच तुमच्या एक किंवा दोन ज्या काही लसी घेऊन झाल्या असतील, त्यांच्या लसीकरणाचे सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या मेसेजचा रिप्लाय म्हणून ताबडतोब पाठवले जाईल. हे सर्टिफिकेट तुम्ही मोबाइलमध्ये सेव्ह करू शकता किंवा त्याची प्रिंट आउट काढून गरजेच्या ठिकाणी ती दाखवून आपले काम सहजपणे पारही पाडू शकता.

prasad.tamhankar@gmail.com

Web Title: Now you can get the coronavirus vaccination certificate on WhatsApp sitting at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.