आता फ्रीमध्ये सेव्ह करता येणार नाहीत फोटो, व्हिडीओ; जाणून घ्या, Google Photos साठी किती द्यावा लागणार 'चार्ज'?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 04:42 PM2020-11-12T16:42:19+5:302020-11-12T16:49:07+5:30
Google Photos : लवकरच गुगल फोटोसाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
नवी दिल्ली - स्मार्टफोन हा प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. अनेक जण फोनमधील फोटो आणि व्हिडीओ हे गुगल फोटो अॅपवर सेव्ह करतात. गुगलची ही सेवा फ्री होती. मात्र आता गुगलच्या या युजर्सना थोडा झटका बसणार आहे. कारण लवकरच गुगल फोटोसाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. नव्या पॉलिसीनुसार, युजर्सना फोटो अॅपवर 15 जीबीहून अधिक डेटा अपलोड करण्यासाठी चार्ज द्यावा लागणार आहे.
1 जून 2021 नंतर गुगलच्या फोटो अॅपमध्ये जास्तीत जास्त 15 जीबीपर्यंतची स्टोरेज मेमरी मोफत उपलब्ध होणार आहे. मात्र त्यापेक्षा जास्त स्टोरेज हवं असल्याच गुगलच्या इतर सेवांप्रमाणेच त्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत. सध्या जीमेल आणि ड्राइव्हसाठी अशा प्रकारे पैसे दिले जातात. गुगलने दिलेल्या माहितीनुसार गुगल फोटोजमधील फोटो आणि व्हिडीओ हे जर 1 जून 2021 आधी सेव्ह केले असतील तर ते अनलिमीटेड स्टोरेजमध्ये ग्राह्य धरले जातील. मात्र त्यानंतर गुगल युजर्सला फक्त 15 जीबीपर्यंतची फ्री स्पेस मिळणार असून त्यापेक्षा अधिक स्टोरेज स्पेस हवी असल्यास पैसे मोजावे लागणार आहेत.
Starting June 1, 2021, new photos and videos uploaded in High quality will begin counting towards your 15GB of Google Account storage.
— Google Photos (@googlephotos) November 11, 2020
Learn more here: https://t.co/SuS34HFjAu
दर आठवड्याला गुगल फोटोजवर 28 अरब फोटो होतात अपलोड
गुगलने दिलेल्या माहितीनुसार दर आठवड्याला गुगल फोटोजवर 28 अरब फोटो अपलोड होतात. नवीन पॉलिसी लागू केल्यानंतर तीन वर्षांमध्येच गुगलची सेवा वापरणारे 80 टक्क्यांहून अधिक युझर्स आपला गुगल फोटोजचा वापर 15 जीबीच्या आत ठेवतील असा विश्वास गुगलने व्यक्त केला आहे. त्यामुळेच 1 जून 2021 नंतर युजर्सला महत्वाचे फोटोच गुगल फोटोजमध्ये सेव्ह करण्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल.
100 जीबी स्टोरेजसाठी महिन्याला 130 रुपये आणि वर्षाला 1300 रुपये चार्ज
गुगल्या नव्या पॉलिसीनुसार, युजर्सना 15 जीबी डेटा हा फ्री असणार आहे. मात्र त्यापेक्षा जास्त असल्यास त्यांन कमीत कमी 100 जीबी स्टोरेजची सुविधा घ्यावी लागेल. ज्याच्यासाठी महिन्याला 130 रुपये किंवा वर्षाला 1300 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. जर युजर्सना 200 जीबी स्टोरेज प्लॅन हवा असेल तर महिन्याला 210 रुपये चार्ज द्यावा लागेल. तसेच 2TB आणि 10TB स्टोरेजसाठी युजर्सना क्रमश: 650 रुपये महीना आणि 3,250 रुपये महीना चार्ज असणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.