18GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; पाहा किती आहे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 07:35 PM2021-03-05T19:35:26+5:302021-03-05T19:37:26+5:30

स्मार्टफोनमध्ये देण्यात आली 120W रॅपिड चार्जिग टेक्नॉलॉजी

Nubia beats Asus launches worlds first smartphone with 18GB RAM know price and specification | 18GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; पाहा किती आहे किंमत

18GB रॅम असलेला जगातील पहिला स्मार्टफोन; पाहा किती आहे किंमत

Next
ठळक मुद्दे18gb रॅम असलेला ठरला जगातील पहिला स्मार्टफोनस्मार्टफोनमध्ये देण्यात आली 120W रॅपिड चार्जिग टेक्नॉलॉजी

आपल्या रेडमॅजिक स्मार्टफोनमध्ये कुलिंग फॅन दिल्यानंतर Nubia नं आणखी एक जबरदस्त फोन लाँच केला आहे. Nubia नं Qualcomm Snapdragon 888 पॉवर प्रोससरसह Red Magic 6 सीरिज लाँच करण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये दोन विशेष स्पेसिफिकेशन्स देण्यात आली आहे. ती स्पेसिफिकेशन्स आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये देण्यात आलेली नाहीत. या स्मार्टफोनमध्ये 165Hz डिस्प्ले आणि 18GB रॅम देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये फास्ट इंटरनल फॅन देण्यात आला आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 120W पर्यंत रॅपिड चार्जिंगही देण्यात आलंय. 

18GB रॅमसोबत Red Magic 6 Pro हा एक स्पेशल एडिशन स्मार्टफोन आहे. याव्यतिरिक्त याच्यासोबत आणखी एक व्हेरिअंटदेखील आहे. 18 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये 512GB चं स्टोरेज देण्यात आलं आहे. याशिवाय आणखी एक स्पेशल एडिशन स्मार्टफोन 16GB रॅम आणि 256GB स्टोरेजसोबत लाँच करण्यात आला आहे. सध्या हे दोन्ही फोन चीनमध्ये लाँच करण्यात आले आहेत. 18GB रॅम असलेल्या स्मार्टफोनची किंमत 6,599 युआन (जवळपास 74,300 रुपये) आहे. तर 16GB रॅम असलेल्या व्हेरिअंटची किंमत 5,599 युआन (जवळपास 63,000 रुपये इतकी आहे. स्पेशल एडिशन असलेल्या या स्मार्टफोनमध्ये ट्रान्सपरंट बॅक देण्यात आली आहे. याशिवाय Redmi Magic 6 आणि Red Magic 6 Pro स्मार्टफोनदेखील कंपनीनं लाँच केले आहेत. लवकरच ते अन्य ठिकाणीही लाँच केले जाणार आहेत.
 


काय आहेत स्पेसिफिकेशन्स?

Red Magic 6 Pro स्मार्टफोन आयर्न ब्लॅक आणि आइस ब्लेड सिल्व्हर या रंगांमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा AMOLED फुल स्क्रीन देण्यात आला आहे. तसंच याचं रिझॉल्युशन 2400X1080 पिक्सेल आहे. या शिवाय स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात आलं आहे. मागील मेन कॅमेरा हा ६४ मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलाय.
 

 
Red Magic 6 Pro मध्ये 4,500 mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 120W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड Red Magic OS 4.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्टफोनचं वजन 220 ग्राम आहे.

Web Title: Nubia beats Asus launches worlds first smartphone with 18GB RAM know price and specification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.