आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन 

By सिद्धेश जाधव | Published: August 19, 2021 03:39 PM2021-08-19T15:39:10+5:302021-08-19T15:39:23+5:30

Nubia Red Magic 6S Specs: 3C ही चिनी सर्टिफिकेशन्स साईट आहे, जिथे मॉडेल नंबर NX669J-S सह एक नूबिया फोन लिस्ट करण्यात आला आहे.

Nubia red magic 6s 3c certification 120w fast charging confirmed launch soon  | आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन 

आसूसला धोबीपछाड देण्यासाठी येणार Nubia Red Magic 6S; 120W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो हा गेमिंग फोन 

Next

काही दिवसांपूर्वी आसूसने आपले दोन नवी गेमिंग स्मार्टफोन्स तैवानमध्ये सादर केले होते. हे फोन 18GB रॅम, 6,000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 888+ प्रोसेसर अश्या दमदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आले होते. आता या फोन्सना नुबीयाच्या आगामी गेमिंग फोनकडून चांगलीच टक्कर मिळू शकते. आता 91Mobiles ने नूबिया रेड मॅजिक 6S चीनमध्ये लाँच होणार असल्याची माहिती दिली आहे. हा आगामी गेमिंग फोन 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे. (Nubia Red Magic 6S spotted on 3c with 120W fast charging) 

Nubia Red Magic 6S 

3C ही चिनी सर्टिफिकेशन्स साईट आहे, जिथे मॉडेल नंबर NX669J-S सह एक नूबिया फोन लिस्ट करण्यात आला आहे. हा नुबीयाचा आगामी स्मार्टफोन असू शकतो, जो रेड मॅजिक 6S या नावाने बाजारात सादर केला जाईल. या स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु लिस्टिंगमधून या फोनचा चार्जिंग स्पीड समजला आहे, हा फोन 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो. हा चार्जिंग स्पीड Nubia Red Magic 6 Pro  मध्ये देखील देण्यात आला होता.  

Nubia Red Magic 6 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Red Magic 6 Pro स्मार्टफोन आयर्न ब्लॅक आणि आइस ब्लेड सिल्व्हर या रंगांमध्ये येतो. या स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाची AMOLED फुल स्क्रीन देण्यात आला आहे. तसेच याचे रिजोल्यूशन 2400X1080 पिक्सेल आहे. या शिवाय स्मार्टफोनमध्ये मागील बाजूला ट्रिपल कॅमरा सेटअप देण्यात आलं आहे. मागील मेन कॅमेरा हा 64 मेगापिक्सेलचा आहे. याशिवाय यात 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलाय. Red Magic 6 Pro मध्ये 4,500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 120W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोन Android 11 वर बेस्ड Red Magic OS 4.0 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या स्मार्टफोनचं वजन 220 ग्राम आहे. 

Web Title: Nubia red magic 6s 3c certification 120w fast charging confirmed launch soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.