मोबाईल गेमर्सचा ‘ड्रीम फोन’ सादर; स्नॅपड्रॅगॉन 888+ चिपसेट. 120W फास्ट चार्जिंगसह Nubia Red Magic 6S Pro लाँच 

By सिद्धेश जाधव | Published: September 6, 2021 06:26 PM2021-09-06T18:26:44+5:302021-09-06T18:29:12+5:30

Nubia Red Magic 6S Pro Launch: Nubia Red Magic 6S Pro स्मार्टफोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक आणि ट्रान्सपरंट कलरमध्ये विकत घेता येईल.

Nubia red magic 6s pro launched check price and specifications  | मोबाईल गेमर्सचा ‘ड्रीम फोन’ सादर; स्नॅपड्रॅगॉन 888+ चिपसेट. 120W फास्ट चार्जिंगसह Nubia Red Magic 6S Pro लाँच 

मोबाईल गेमर्सचा ‘ड्रीम फोन’ सादर; स्नॅपड्रॅगॉन 888+ चिपसेट. 120W फास्ट चार्जिंगसह Nubia Red Magic 6S Pro लाँच 

googlenewsNext
ठळक मुद्देNubia Red Magic 6S Pro स्मार्टफोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. Red Magic 6S Pro स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट Snapdragon 888 Plus SoC मिळते.

ZTE ने आपला नवीन गेमिंग स्मार्टफोन Nubia Red Magic 6s Pro सादर केला आहे. या फोनमध्ये कंपनीने सर्वच स्पेसिफिकेशन्स वरच्या दर्जाची दिले आहेत. या फोनमध्ये कंपनीने स्नॅपड्रॅगनचा नुकताच लाँच झालेला Snapdragon 888+ SoC चिपसेट दिला आहे. हा फोन 165Hz रिफ्रेश रेट, 720Hz टच सॅम्पलिंग रेट, 450Hz टच सॅंप्लिंग रेट असलेले शोल्डर ट्रिगर, 16GB रॅम आणि कुलिंग फॅन अश्या स्पेक्ससह सादर करण्यात आला आहे. कागदावर Nubia Red Magic 6S Pro नक्कीच मोबाईल गेमर्सचा ड्रीम फोन वाटतो.  

Nubia Red Magic 6S Pro ची किंमत 

Nubia Red Magic 6S Pro स्मार्टफोन सध्या चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन ब्लॅक आणि ट्रान्सपरंट कलरमध्ये विकत घेता येईल. या फोनच्या चार व्हेरिएंटची किंमत पुढीलप्रमाणे आहे:  

  • 8GB + 128GB: 3,999 CNY (सुमारे 45,250 रुपये)  
  • 12GB + 128GB: 4499 CNY (सुमारे 50,900 रुपये) 
  • 12GB + 256GB: 4899 CNY (सुमारे 55,400 रुपये)  
  • 16GB + 256GB: 5399 CNY (सुमारे 61,100 रुपये)  

Nubia Red Magic 6S Pro चे स्पेसिफिकेशन्स 

Red Magic 6S Pro स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 700 निट्स मॅक्सिमम ब्राईटनेस, 165Hz रिफ्रेश रेट आणि 720Hz टच सॅंपिलंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमधील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तुमचा हार्ट रेट देखील मोजू शकतो. हा फोन Android 11 वर आधारित RedMagic OS 4.0 वर चालतो. 

वर सांगितल्याप्रमाणे Red Magic 6S Pro स्मार्टफोनमध्ये लेटेस्ट Snapdragon 888 Plus SoC मिळते. तसेच या गेमिंग फोनमध्ये 16GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. गेमिंगच्या वेळी स्मार्टफोन जास्त गरम होऊ नये म्हणून कंपनीने या फोनमध्ये ICE 7.0 कूलिंग सिस्टम दिली आहे. तसेच या फोनमधील कूलिंग 20,000 RPM वेगाने फिरतो.  

Nubia Red Magic 6S Pro च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. या कॅमेऱ्याला 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या डेप्थ सेन्सरची जोड देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या भन्नाट फोनमधील 4,500mAh बॅटरी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Web Title: Nubia red magic 6s pro launched check price and specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.