शक्तिशाली प्रोसेसर, जबरदस्त रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह 6 सप्टेंबरला लाँच होणार Nubia Red Magic 6S Pro  

By सिद्धेश जाधव | Published: September 2, 2021 07:19 PM2021-09-02T19:19:59+5:302021-09-02T19:24:48+5:30

Nubia Red Magic 6s Launch: Red Magic 6S series च्या अधिकृत लाँचच्या आधी कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स टीज केले आहेत. नुबियाचा आगामी गेमिंग स्मार्टफोन 720Hz टच सॅप्लिंग रेट आणि 120W फास्ट चार्जसह सादर केला जाईल.

Nubia red magic 6spro gaming phone to be launched on september 6  | शक्तिशाली प्रोसेसर, जबरदस्त रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह 6 सप्टेंबरला लाँच होणार Nubia Red Magic 6S Pro  

शक्तिशाली प्रोसेसर, जबरदस्त रॅम आणि शानदार कॅमेऱ्यासह 6 सप्टेंबरला लाँच होणार Nubia Red Magic 6S Pro  

Next
ठळक मुद्देनुबीयाच्या आगामी गेमिंग फोनमध्ये रियर पॅनलवर वर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो या गेमिंग स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ SoC देण्यात येईल.

ZTE ने आपले गेमिंग स्मार्टफोन नुबीया रेड मॅजिक सीरिज अंतर्गत सादर करते. यावर्षीच्या सुरवातीला या सीरिजमध्ये कंपनीने Nubia Red Magic 6 स्मार्टफोन लाँच केला होता. हे एक फ्लॅगशिप गेमिंग स्मार्टफोन होता, ज्यात Snapdragon 888 चिपसेट, 4050 mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग असे दमदार स्पेक्स मिळाले होते. आता कंपनी नवीन गेमिंग स्मार्टफोन सीरिज लाँच करण्याची तयारी करत आहे. ही सीरिज चीनमध्ये 6 सप्टेंबरला Red Magic 6S series नावाने लाँच केली जाईल.  

Red Magic 6S series च्या अधिकृत लाँचच्या आधी कंपनीने काही स्पेसिफिकेशन्स टीज केले आहेत. नुबियाचा आगामी गेमिंग स्मार्टफोन 720Hz टच सॅप्लिंग रेट आणि 120W फास्ट चार्जसह सादर केला जाईल. तसेच काही दिवसांपूर्वी या सीरिजमधील Pro व्हेरिएंट सर्टिफिकेशन साईट TENAA सर्टिफिकेशन लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून Nubia Red Magic 6S Pro स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती मिळाली आहे.  

Nubia Red Magic 6S Pro TENAA 

TENAA वरील लिस्टिंगनुसार नुबियाच्या आगामी गेमिंग स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आणि रिफ्रेश रेट 165Hz असेल. या गेमिंग स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 888+ SoC देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या फोनमध्ये 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंतची स्टोरेज मिळेल. टेनावर या फोनचे वजन 215 ग्राम आणि जाडी 9.5mm असेल, असे सांगण्यात आले आहे.  

नुबीयाच्या आगामी गेमिंग फोनमध्ये रियर पॅनलवर वर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. यात 64MP चा मुख्य कॅमेरा दिला जाऊ शकतो. इतर सेन्सरची माहिती अजून समोर आली नाही. सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल. पावर बॅकअपसाठी या फोनच्या प्रो मॉडेलमध्ये 4,380 mAh ची बॅटरी मिळेल, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. हा गेमिंग फोन ग्रीन, ब्लॅक, रेड आणि ब्लू ग्रेडिएंट कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. 

Web Title: Nubia red magic 6spro gaming phone to be launched on september 6 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.