एकच नंबर! 165W च्या सुपर फास्ट चार्जिंगसह येतोय गेमिंग फोन; 16GB RAM सह घेता येणार विकत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 04:07 PM2021-12-02T16:07:14+5:302021-12-02T16:07:41+5:30
Nubia Red Magic 7 Gaming Phone: काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत.
Nubia Red Magic 7 Gaming Phone: Nubia आपल्या फ्लॅगशिप Gaming Phone साठी ओळखली जाते. यावर्षी कंपनीनं Red Magic 6 सीरिज सादर केली होती. आता कंपनी Red Magic 7 सीरीज लाँच करण्याची तयारी करत आहे. या सीरिजमध्ये Red Magic 7 आणि 7 Pro हे दोन फोन येत्या काही आठवड्यांत ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतात. आता कंपनीनं या फोनमधील चिपसेटची अधिकृतपणे माहिती दिली आहे, तसेच काही स्पेक्स लीकमधून समोर आले आहेत.
नुबियानं आपल्या आगामी गेमिंग स्मार्टफोनच्या लाँचची अधिकृत माहिती दिली नाही. परंतु कंपनीनं आपला आगामी गेमिंग स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला, असं सांगितलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत.
Red Magic 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स
Nubia Red Magic 7 स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट झाला आहे. या वेबसाईटवर फोन NX679J या मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंगनुसार आगामी नुबिया स्मार्टफोन वेगवान 165W सुपरफास्ट चार्जिंगसह सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वीच्या Bluetooth SIG सर्टिफिकेशननुसार या फोनमध्ये Bluetooth 5.2 कनेक्टिविटी असल्याचं समजलं आहे. कंपनीनं Snapdragon 8 Gen 1 SoC चिपसेटची माहिती दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार हा फोन 16GB पर्यंत रॅम आणि 256GB/ 512GB स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो.