कधीच हँग न होणारा फाडू फोन; 16GB रॅम, पावरफुल प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा
By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 05:16 PM2022-04-13T17:16:16+5:302022-04-13T17:16:25+5:30
Nubia Red Magic 7 Pro स्मार्टफोन 16GB RAM, 512GB मेमरी, 120Hz रिफ्रेश रेट आणि Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह लाँच झाला आहे.
Nubia Red Magic 7 Pro स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये चीनमध्ये सादर करण्यात आला होता. आता या दमदार स्मार्टफोननं जागतिक बाजारात एंट्री घेतली आहे. चीनपेक्षा काही फीचर्समध्ये डाउनग्रेड करण्यात आले आहेत. तरीही हा गेमिंग फोन 120Hz रिफ्रेश रेट, 16GB RAM, 64MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 65 वॉट फास्ट चार्जिंग सारख्या दमदार स्पेक्ससह बाजारात उतरला आहे.
सध्या हा Nubia Red Magic 7 Pro आशिया-पॅसिफिक, युरोप, लॅटिन अमेरिका, मिडल ईस्ट आणि नॉर्थ अमेरिकेत विकला जाईल. तिथे या डिवाइसची किंमत 799 डॉलर (सुमारे 60,900 रुपये) रुपयांपासून सुरु होईल. भारतीयांच्या नशिबात हा मोबाईल आहे की नाही याची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही.
Nubia Red Magic 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Nubia Red Magic 7 Pro मध्ये 6.8-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट, 960Hz टच सॅम्प्लिंग रेट आणि 600 निट्स पीक ब्राईट्नेसला सपोर्ट करतो. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. फोनमध्ये 16GB LPDDR5 RAM देण्यात आला आहे. यात 512GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज मिळते.
चांगल्या गेमिंगसाठी या फोनमध्ये सुधारित शोल्डर ट्रिगर, साऊंड, हॅप्टिक फीडबॅक आणि लाईटिंग इफेक्ट देण्यात आले आहेत. गेमिंग करताना फोन गरम होऊ नये म्हणून Turbo RGB फॅन सह ICE 9.0 कूलिंग सिस्टम देण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C पोर्ट मिळतो.
बॅक पॅनल वर 64MP चा प्रायमरी सेन्सर, 8MP ची अल्ट्रावाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. तर फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यातील 5000mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि फक्त 17 मिनिटांत फुल चार्ज होते.