Old Cooler Hacks: 500 रुपयांचे यंत्र, तुमच्या घरातील जुना कुलर एसी होऊन जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 15:01 IST2023-04-02T15:01:36+5:302023-04-02T15:01:47+5:30
गरमीचे दिवस सुरु झाले आहेत. लोकांनी घरात पंखे, एसी आणि कुलर लावायला सुरुवात केली असेल. पंख्याने काही दुपारची गरमी ...

Old Cooler Hacks: 500 रुपयांचे यंत्र, तुमच्या घरातील जुना कुलर एसी होऊन जाईल
गरमीचे दिवस सुरु झाले आहेत. लोकांनी घरात पंखे, एसी आणि कुलर लावायला सुरुवात केली असेल. पंख्याने काही दुपारची गरमी कमी होत नाही, रात्रीची देखील लाहीलाही होते. मग एसी महाग पडतो म्हणून कुलर. तो जुना झाला असेल तर थंड हवा फेकणार नाही. मग नवा घेतला जातो. एवढा खर्च करण्यापेक्षा त्या जुन्याच कुलरला ५०० रुपये खर्च करा आणि थंड हवा मिळवा.
तुम्हाला एक अशी ट्रिक सांगत आहोत, ज्यामुळे तुम्हाला पांघरुण घेण्याएवढी थंड हवा मिळेल. जर तुम्हाला थंड हवा हवी असेल तर कुलरला ‘Stookin 9V DC सबमर्सिबल पंप मोटर’ जोडावी लागणार आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैसे देखील खर्च करावे लागणार नाहीत.
हा सबमर्सिबल पंप अॅल्युमिनिअमचा असतो. त्यामध्ये एक हॉबी किट असते. ते पाण्याला ब्लॉ़क करून थंड करते. याला अॅल्यूमिनिअम वॉटर कुलिंग ब्लॉकही म्हटले जाते. याद्वारे पाणी थंड होते यामुळे कुलर थंड हवा बाहेर फेकायला लागतो.
Stookin 9V DC सबमर्सिबल पंप मोटर खरेदी करायची असेल तर तुम्ही ती ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करू शकता. याची किंमत ५०० ते १००० रुपयांत आहे. हे उपकरण तुमच्या जुन्या कुलरमध्ये पुन्हा थंडावा आणेल. तुमचे नव्या कुलरचे पैसे देखील वाचतील.