मस्तच! ३० रुपयांत जुना कूलर होईल रुम हीटर, फक्त हे काम करा, वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 04:29 PM2022-12-04T16:29:37+5:302022-12-04T16:32:02+5:30
हिवाळा सुरू होताच रूम हीटरच्या किमतीही झपाट्याने वाढू लागतात. हिवाळ्यात अनेकजण हीटर विकत घेतात.
हिवाळा सुरू होताच रूम हीटरच्या किमतीही झपाट्याने वाढू लागतात. हिवाळ्यात अनेकजण हीटर विकत घेतात. जर तुम्ही हीटर विकत घेणार असाल तर आज आम्ही तुम्हाला एक अशी युक्ती सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही जुना कूलर रूम हीटर बनवू शकता.
कूलरला हीटर बनवण्यासाठी, तुम्हाला हीटिंग एलिमेंटची आवश्यकता आहे. आपल्याला बाजाराच कुठेही स्प्रिंग हीटिंग खरेदी करता येऊ शकतो. त्याची किंमतही फारशी नाही. सहसा स्प्रिंग हीटिंग एलिमेंट 30-50 रुपयांना मिळतो. तुम्हाला कूलरच्या पुढच्या ग्रिलवर डावीकडे आणि उजवीकडे 3-3 स्क्रू फिट्ट करावे लागतील. यावर तुम्हाला हीटिंग एलिमेंट बसवावे लागेल. हीटिंग एलिमेंट बसवल्यानंतर, तुम्हाला कूलरचा पंखा तपासावा लागेल.
कूलर सुरू करण्यापूर्वी तुम्हाला हीटिंग एलिमेंट सुरू करावे लागेल. ते सुरू झाल्यावर हीटिंग सुरू होईल. एलिमेंट गरम झाल्यावर पंखा सुरू करावा लागेल आणि तुम्हाला दिसेल की लगेचच कूलरमधून गरम हवा येईल.
गरजेनुसार तुम्ही कूलरचा दोन प्रकारे वापर करू शकाल. तुम्ही Amazon वरून Heater Spring Element Coil 1000 Watt देखील खरेदी करू शकता. तुम्हाला हे हीटिंग एलिमेंट Amazon वर Rs.76 मध्ये मिळत आहे.