डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:41 AM2024-09-25T10:41:41+5:302024-09-25T10:41:53+5:30

आयफोन महागडा वाटत असला तरी त्याच्या खरेदीसाठी भारतात उडालेली झुंबड पाहता त्याच्यासाठी कितीही पैसे मोजायला ही मंड़ळी तयार असतात ...

Old iPhone in discount or new iPhone 16? Six features that will blow your mind… | डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...

डिस्काऊंटमधला जुना आयफोन की नवा iPhone 16? सहा फिचर्स जे तुमचे मन वळवतील...

आयफोन महागडा वाटत असला तरी त्याच्या खरेदीसाठी भारतात उडालेली झुंबड पाहता त्याच्यासाठी कितीही पैसे मोजायला ही मंड़ळी तयार असतात हे समोर आले. आयफोन १६ लाँच झाल्यानंतर आयफोन १५, १४, १३ च्या सिरीजच्या किंमती पडल्या आहेत. परंतू, १०-२० हजारासाठी लेटेस्ट आयफोन १६ घेण्याची संधी का सोडावी? असाही प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. बजेट प्राथमिकता असली तरी जुन्या मॉडेल्सपेक्षा आयफोन १६ घेणे किती फायद्याचे आहे, ही सहा कारणे तुमची व्यवहार्यता बदलून टाकणारी ठरणार आहेत. 

iPhone 16 खरेदी करण्याचे मुख्य कारण म्हणजे यातील A18 चिप आहे. आयफोन १४ मध्ये ए१५ चिप आहे, तिच्यापेक्षा नव्या फोनमधील चिप ५० टक्के फास्ट आहे. हिच जुनी चिप आयफोन १३ मध्येही आहे. iPhone 16 ची चिप गेमिंगला मस्त आहे. फक्त आयफोन १५ प्रो मध्ये खेळता येणारे गेम या आयफोन १६ मध्ये खेळता येणार आहेत. 

आयफोन १६ खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा... https://fktr.in/MAWa578

या फोनमध्ये एक नवीन प्रकारचा सिरॅमिक ग्लास वापरण्यात आला आहे, जो जुन्या आयफोनपेक्षा ५० टक्के मजबूत आहे. व इतर कंपन्यांच्या फोनपेक्षा दुप्पटीने मजबूत आहे. 

कॅमेरा कंट्रोलसाठी एक बटन देण्यास आले आहे. हे बटण खाली-वर दाबून कॅमेरा नियंत्रित करता येणार आहे. यामुळे फोटो, व्हिडीओ घेणे सोपे जाणार आहे. तसेच टुल्समध्ये जाणे देखील सहज सोपे होणार आहे. 

दोन कॅमेरे पण चार कॅमेरांचे काम करण्याची क्षमता 
आयफोन १६ मध्ये दोन कॅमेरे आहेत. यामध्ये पहिला 48 मेगापिक्सेलचा आणि दुसरा नवीन अल्ट्रा-वाइड कॅमेरा. हे दोन्ही कॅमेरे एकत्रितपणे चार कॅमेरांचे काम करतात. लहानातल्या लहान वस्तूचा फोटो काढताना झूम वाढविता येते आणि क्लिअर फोटो क्लिक करता येतात. 

आयफोन १६ खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा... https://amzn.to/3ZCIOpW

या नव्या फोनमध्ये डायनॅमिक आयलंड फिचर देण्यात आले आहे, जे तुमच्या फोनमध्ये कोणती अॅप चालू आहेत, नवीन अपडेट देते. हे फिचर आयफोन १५, १४ प्रो मध्ये देखील येते. 

जुन्या सायलेंट बटणाच्या जागी नवीन बटण देण्यात आले आहे. त्याचे काम फोनची रिंग सायलेंट करण्यासोबतच फ्लॅशलाईट चालू करणे, कॅमेरा ओपन करणे, डीएनडी मोडसह अन्य बऱ्याच गोष्टी करू शकता. 

Web Title: Old iPhone in discount or new iPhone 16? Six features that will blow your mind…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Apple Incअॅपल