अवघ्या ३ हजारात जुना TV होऊन जाईल Smart TV, कसं? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 03:46 PM2023-02-24T15:46:58+5:302023-02-24T15:47:28+5:30
सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही.
सध्याच्या काळात स्मार्ट टीव्हीची मागणी आणि गरज दोन्ही वाढली आहे. नवीन स्मार्टफोन बाजारात येताच यूझर्स ज्या पद्धतीने बदलतात, त्यानुसार टीव्ही बदलू शकत नाही. तुम्हालाही स्मार्ट टीव्ही घ्यायचा असेल पण बजेट तुम्हाला साथ देत नसेल तर आज तुमचे टेन्शन दूर होईल. आता तुम्ही तुमच्या जुन्या डब्बा टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकता. आज आपण अशाच उपकरणाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा टीव्ही इंटरनेटशी कनेक्ट करू शकता.
आता तुम्ही विचार करत असाल की ऑडिओचे काय करावे, तर तुम्ही साउंडबारला 3.5mm हेडफोनने कनेक्ट करू शकता, यामुळे तुमच्या जुन्या टीव्हीची ऑडिओ गुणवत्ता देखील सुधारेल. लक्षात असू द्या की स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही बॉक्स कनेक्ट करण्यासाठी जुन्या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट असणे आवश्यक आहे.
टीव्हीला HDMI पोर्ट नाही?
तुमच्या जुन्या टीव्हीमध्ये HDMI पोर्ट नसेल तर तुम्ही या परिस्थितीत कोणतेही HDMI ते AV/ARC कन्व्हर्टर वापरू शकता. याशिवाय तुमच्या घरात वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे खूप महत्त्वाचं आहे. आज आपण Android उपकरणांबद्दल माहिती घेणार आहोत जे तुमच्या जुन्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकतील.
या उपकरणांमुळे जुना टीव्ही होईल स्मार्ट
Amazon Fire TV Stick with Alexa Voice Remote: अॅमेझॉन फायर टीव्ही स्टिक अॅलेक्सासह सुसज्ज व्हॉइस रिमोट कंट्रोल सपोर्टसह स्मार्ट टीव्हीचा अनुभव देते. यात, तुम्हाला Youtube सोबत सर्व लोकप्रिय स्ट्रीमिंग अॅप्सचा वापर करता येतो. तुम्ही तुमच्या जुन्या टीव्हीसाठी फायर टीव्ही स्टिकच्या नॉन-4K आवृत्तीचा पर्याय निवडू शकता. ही स्टिक टीव्हीच्या एचडीएमआय पोर्टशी कनेक्ट होते आणि त्याची किंमत ३,९९९ रुपये इतकी आहे.
Tata Sky Binge+ Android set-top-box: Tata Sky Binge+ Android सेट टॉप बॉक्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉप, टॅबलेट किंवा फोनवर कोणताही कार्यक्रम, चित्रपट, संगीत आणि गेम पाहू शकता. सेट टॉप बॉक्सच्या इंटरनल Chromecast फिचरमुळे तुम्ही थेट तुमच्या टीव्हीवरही याचा अनुभव घेऊ शकता. याशिवाय यामध्ये गुगल असिस्टंट देण्यात आले असून ते व्हॉईस सर्च फीचरलाही सपोर्ट करतं. यामध्ये तुम्ही Google Play Store वरून गेम्स आणि अॅप्सचाही अॅक्सेस मिळवू शकता. हे 4K, HD LED, LCD किंवा प्लाझ्मा तंत्रज्ञानासह सर्व टीव्हींना सपोर्ट करतं. Tata Sky Binge+ Android सेट-टॉप-बॉक्सची किंमत ३,९९९ रुपये आहे.