बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 04:50 PM2019-05-09T16:50:10+5:302019-05-09T16:50:36+5:30

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनसाठी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा तयार केला आहे.

OMG...! The 64-megapixel camera coming in Samsung's mobile phone | बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

बापरे...! सॅमसंगच्या मोबाईलमध्ये येणार 64 मेगापिक्सलचा कॅमेरा

Next

सध्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांमध्ये कॅमेरांची संख्या आणि त्यांच्या क्षमतेवरून मोठी स्पर्धा लागलेली आहे. दर 10 दिवसाला वेगवेगळी कंपनी मोबाईल लाँच करतच आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय असतो तो म्हणजे कॅमेरा. सध्या बाजारात सोनीच्या 48MP IMX586 सेन्सरच्या कॅमेराची चलती आहे. परंतु आता या कॅमेराला सॅमसंगच्या रुपात तगडा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. 


दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनसाठी 64 मेगापिक्सलचा कॅमेरा तयार केला आहे. हा सेन्सर साधारण वातावरणात 64 मेगापिक्सल आणि अंधारात 16 मेगापिक्सलचे फोटो खेचू शकणार आहे. अत्युच्च फोटोग्राफीसाठी सॅमसंगने 64MP ISOCELL Bright GW1 सेन्सरमध्ये रेमोजेक अल्गोरिदम आणि पिक्सल मर्जिंग टेट्रासेल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. कंपनीने यामध्ये 100dB पर्यंतचा रिअलटाईम HDR सपोर्ट देण्यात आला आहे. सध्याच्या कॅमेरांची रेंज 60dB पर्यंत असते. 


हा सेन्सर ड्युअल कन्व्हर्जन गेनसोबत येतो. जो नॉईस कमी करण्याबरोबरच फोटोमध्ये रंग एकदम बरोबर भरतो. यासोबत हाय-परफॉर्मेंस फेज डिटेक्शन, ऑटोफोकस टेक्नॉलॉजी आणि फुल एचडी सपोर्ट देण्यात आला आहे. या सेन्सरमध्ये 480 फ्रेम प्रतीसेकंद वेगात स्लो-मोशन व्हिडीओ शूट केला जाऊ शकतो. 

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या सेन्सर व्यापाराचे उपाध्यक्ष यॉन्गिन पार्क यांनी सांगितले की, अॅडव्हान्स आणि जादा पिक्सल टॅक्नॉलॉजीमुळे सॅमसंगचा नवा कॅमेरा चांगल्या फोटोग्राफीला नवीन दिशा देणार आहे. तसेच युजरच्या रेकॉर्डिंगच्या अनुभवाला बदलून टाकणार आहे. 
सॅमसंग या सेन्सरला कोणत्या मोबाईलमध्ये वापरणार आहे ते जाहीर केलेले नाही. मात्र, एका अंदाजानुसार गॅलेक्सी एस सिरिज आणि नोट सिरिजच्या पुढील डिव्हाईसमध्ये मिळण्याची शक्यता आहे. 

Web Title: OMG...! The 64-megapixel camera coming in Samsung's mobile phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :samsungसॅमसंग