OMG! आयफोन १४ ची लोकप्रियता घसरली; अॅपलला दशकातला सर्वात मोठा फटका, ही चूक नडली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 06:54 PM2023-05-12T18:54:07+5:302023-05-12T18:56:47+5:30
ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे.
जगातील सर्वात महागडी स्मार्टफोन मेकर कंपनी अॅपलला गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच एवढा जबर धक्का बसला आहे. अॅपल गेली काही वर्षे तेच तेच डिझाईनचे आयफोन लाँच करत आहे. यामुळे त्यात नाविन्य असे काहीच नसते. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या ११ वर्षांत पहिल्यांदाच आयफोनची पॉप्युलॅरिटी घसरली आहे.
गेल्या दशकभरात iPhone 14 ला तेवढी प्रसिद्धी मिळालेली नाहीय. आयफोनच्या इतिहासात iPhone 5 वर अखेरची टीका झाली होती. यानंतर आयफोन १४ ला सर्वात कमी ५ स्टार रेटिंग मिळाली आहे. हा सर्व्हे perfectRec नावाच्या कंपनीने केला आहे. त्यांनी थोडे थोडके नव्हे तर 6,69,000 हून अधिक युजर्सनी दिलेल्या प्रतिक्रियांचा अभ्यास केला आहे.
आयफोन 14 लोकांमध्ये पूर्वीच्या आयफोनप्रमाणे लोकप्रिय झालेला नाही, हे या सर्व्हेतून दिसत आहे. आयफोन 5 च्या लोकप्रियतेत थोडीशी घट झाल्याचेही दिसले आहे. याशिवाय iPhone 6 ते iPhone 13 पर्यंत सर्व फोनचे रेटिंग वाढले आहे. iPhone 13 ला 80% पर्यंत 5-स्टार रेटिंग मिळाले, तर iPhone 14 हा 72% टक्क्यांवर घसरला आहे.
ही घसरण फक्त iPhone 14 च्या बेस मॉडेलमध्येच नाही, तर iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये दिसून आली आहे. आयफोनच्या 5 स्टार रेटिंगमध्ये वाढ हे आयफोनने कालांतराने स्वतःमध्ये सुधारणा केल्यामुळे झाली आहे. Apple च्या हार्डवेअर, वैशिष्ट्ये आणि डिझाइनमध्ये कोणतेही मोठे बदल न केल्यामुळे आयफोन १४ ला रेटिंगमध्ये फटका बसला आहे. याशिवाय कंपनीने लेटेस्ट जनरेशनच्या आयफोनमध्ये जुना प्रोसेसर वापरला आहे. नवीन डायनॅमिक आयलंड फीचर फक्त प्रो मॉडेल्ससाठी दिले आहे. याचाही परिणाम झाला आहे.