बापरे! हा पठ्ठया आहे तरी कोण? एका वर्षात केले 20 कोटी कॉल्स; तासाला 27 हजार लोकांना दिला त्रास
By सिद्धेश जाधव | Published: December 18, 2021 12:39 PM2021-12-18T12:39:09+5:302021-12-18T12:39:42+5:30
सर्वात जास्त स्पॅम कॉल्स करणाऱ्या देशांच्या यादीत यावर्षी भारत 9 व्या क्रमाकांवरून चौथ्या क्रमांकावर आला आहे. एका स्पॅमरनं तर भारतात यावर्षी सुमारे 20 कोटींपेक्षा जास्त कॉल्स केले आहेत.
Truecaller नं यावर्षीच्या स्पॅम कॉल्सचा डेटा शेयर केला आहे. या डेटामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत भारतातील स्पॅम कॉल्सची संख्या वाढली आहे. तसेच एका स्पॅमरनं स्पॅम कॉल्सचे विक्रम मोडीत काढले आहेत. या कॉल्सचा लोकांना फक्त त्रास होत नाही तर यामुळे अनेकांची फसवणूक देखील होते.
TrueCaller नं दिलेल्या माहितीनुसार, फक्त एका स्पॅमरनं भारतात यावर्षी 202 मिलियन स्पॅम कॉल्स केले आहेत. म्हणजे एका फोन नंबरवरून दिवसाला 6,64,000 लोकांना कॉल करून त्रास देण्यात आला आहे. यासाठी या नंबरवरून दर तासाला 27,000 कॉल्स करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हा डेटा फक्त 10 महिन्यांचा आहे.
ट्रू कॉलरनं जगभरातील देशांची देखील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यात जानेवारी 2021 ते ऑक्टोबर 2021 पर्यंतच्या डेटाचा समावेश आहे. ट्रू कॉलर जगभरातील टॉप स्पॅमर्सची नोंद ठेवतं आणि अशा स्पॅमर्सना ब्लॉक करण्याचं काम देखील करते. कंपनीच्या स्पॅमर्सच्या यादीत भारतातील एका स्पॅमरचा समावेश आहे. ज्याने यावर्षी 20 कोटींपेक्षा जास्त कॉल्स केले आहेत.
ट्रू कॉलरनं सर्वाधिक स्पॅम कॉल्स करणाऱ्या देशांची यादी जाहीर केली आहे. 20 देशांच्या यादीत भारत 4 थ्या क्रमांकांवर आहे. यावर्षी स्पॅम कॉल्सचं प्रमाण वाढल्यामुळे 9 नंबरवरून भारत 4 थ्या क्रमांकावर आला आहे. देशात एका युजरला दार महिन्याला सरासरी 16 स्पॅम कॉल्स येतात. यादीत ब्राजील अग्रस्थानी तर पेरू दुसऱ्या क्रमांकावर आहे. Peru आहे जहां हर महीने युजर्स कडे जवळपास 18 स्पॅम कॉल्स आते आहेत.
हे देखील वाचा
स्मार्टफोनच्या तळाला असलेल्या हा छोटा होल बुजवला तर? याचा उपयोग तरी काय?; जाणून घ्या
स्मार्टफोन, स्मार्ट टीव्हीवर मिळतेय भरघोस सूट; OnePlus 9 सीरीजवर 8,000 रुपयांपर्यंतची बचत