OnePlus 10 च्या जबरदस्त डिजाइनचा खुलासा; नवीन Nord फोन देखील लवकरच येणार बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 05:34 PM2021-09-06T17:34:39+5:302021-09-06T17:39:39+5:30
Oneplus 10 Design Leak: OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल.
Oneplus अशी कंपनी आहे जी वर्षातून नेमकेच स्मार्टफोन मॉडेल बाजारात सादर करते. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या मिडरेंज नॉर्ड सीरिजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर केला होता. तर आता OnePlus 9 RT स्मार्टफोनची तयारी सुरु आहे, जो पुढील महिन्यात भारत आणि चीनमध्ये लाँच होऊ शकतो. हा देखील मिडरेंज सेगमेंटमध्ये सादर होणारा फोन आहे, अशी चर्चा आहे. परंतु त्याहीपेक्षा OnePlus चाहते पुढील वर्षीच्या फ्लॅगशिप OnePlus 10 सीरीजची जास्त वाट बघत आहेत.
OnePlus 10 सीरिज 2022 मध्ये मार्च आणि एप्रिल मध्ये लाँच होऊ शकते. परंतु ही एक फ्लॅगशिप सीरिज आहे जी OnePlus 9 सीरीजची जागा घेईल. आता टिपस्टर योगेश बरारने या सीरिजच्या डिजाईनची माहिती दिली आहे. त्याने दावा केला आहे कि OnePlus 10 ची डिजाइन OnePlus 9 सारखीच असेल. आगामी OnePlus 10 Pro स्मार्टफोन कर्व एज आणि पंच होल कटआउटसह येईल आणि तर रेगुलर व्हर्जन फ्लॅट स्क्रीनसह सादर केला जाईल. तसेच कंपनी Nord सीरिजच्या नवीन फोन आणि अॅक्सेसरीजवर देखील काम करत आहे, जे ऑक्टोबर मध्ये होऊ शकतात.
आगामी OnePlus 9 RT चे लीक स्पेसिफिकेशन्स
OnePlus 9 RT मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह अॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित आक्सिजनओएस 12 वर चालेल. हा फोन OxygenOS 12 सह लाँच होणारा पहिला स्मार्टफोन असेल. रिपोर्टनुसार या फोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 870प्लस चिपसेट मिळू शकतो. फोटोग्राफीसाठी या वनप्लस फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात येईल. वनप्लस 9 आरटी मधील 4,500एमएएचची बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.