फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 05:05 PM2021-12-06T17:05:46+5:302021-12-06T17:07:16+5:30

OnePlus 9 नंतर आता कंपनी याच लाइनअपमध्ये OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. कंपनीनं आपल्या फ्लॅगशिप फोनबद्दल दिली माहिती. 

OnePlus 10 to feature Qualcomm Snapdragon 8 Gen 1 confirms CEO know features | फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स

फ्लॅगशिप प्रोसेसरसह लाँच होणार OnePlus 10; कंपनीचे CEO Pete Lau यांनी केला खुलासा, पाहा फीचर्स

Next

OnePlus 10 Series Launch: फीचर्स आणि चांगल्या स्पेसिफिकेशनसाठी OnePlus हा ब्रँड ओळखला जातो. स्मार्टफोन सेगमेंटमध्ये OnePlus ही कंपनी अन्य स्पर्धक कंपन्यांना स्पर्धा देत आहेत. या कंपनीचे फोन कायमच आपल्या अपकमिंग सीरिज आणि लाँच बाबत चर्चेचे विषय ठरत असतात. OnePlus 9 सीरिजनंतर कंपनी आता OnePlus 10 सीरिजवर काम करत आहे. यासंदर्भात कंपनीचे सीईओ Pete Leu यांनी खुलासा केला आहे. 

OnePlus 10 सीरिज लेटेस्च क्वॉलकॉम फ्लॅगशिप प्रोसेसरसह येणार असल्याचा दावा Pete leu यांनी केला आहे. यासोबतच नव्या नव्या सीरिजबाबत अनेक चर्चा वर्तवल्या जात आहेत. यावरून ही नवी सीरिज लवकरच बाजारात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सीरिज 2022 मध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अधिकृतपणे लाँच केली जाईल. हा स्मार्टफोन सर्वप्रथम चीनमध्ये लॉन्च केला जाईल. तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापर्यंत हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाऊ शकतो.

काय असेल खास?
इंटनेटवर वनप्लसच्या आगामी स्मार्टफोच्या स्पेसिफिकेशनबाबत चर्चा सुरू आहे. हे फोन स्नॅपड्रॅगन 8 GEN 1 चिपसेटसोबत येतात. हा क्वॉलकॉम मोबाइलसाठी नुकताच लाँच करण्यात आलेला फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. वन प्लसचे सीईओ पीट लाउ यांनी आता या वृत्ताला दुजोरा दिलाय.

नवा चिपसेट कंपनीच्या नेक्स्ट जनरेशन न्यू प्रोडक्ट्समध्ये सामील करण्यात आल्याचे फोनएरेनाद्वारे पाहण्यात आलेल्या एका वीबो पोस्टमध्ये म्हटलं आहे. चिपसेटच्या लाँचदरम्यानच कंपनीनं आपल्या नव्या डिव्हाईसवर या चिपसेटचा वाप करणार असल्याचं म्हटलं होतं. 

काय असतील संभाव्य स्पेसिफिकेशन?
लीक झालेल्या माहितीनुसार, OnePlus 10 Pro वर 125W फास्ट चार्जिंग मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय त्यात 5000mAh बॅटरी असू शकते. डिस्प्लेबाबत सांगायचं झालं तर यात 6.7-इंचाचा QHD+ डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेट असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. अनेक रेंडर्सनी आगामी OnePlus फ्लॅगशिप वर एक नवं कॅमेरा सेटअप दाखवलं आहे. फोनमध्ये रियर कॅमेरा मॉड्यूल, एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअपही दिलं जाऊ शकतं. याशिवाय समोर एक पंच-होल सेल्फी शूटर असू शकतो. OnePlus 10 Pro ब्लॅक, व्हाईट आणि ग्रे कलर पर्यायांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Web Title: OnePlus 10 to feature Qualcomm Snapdragon 8 Gen 1 confirms CEO know features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.