फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: April 22, 2022 12:11 PM2022-04-22T12:11:17+5:302022-04-22T12:11:27+5:30

OnePlus 10 स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत, हा डिवाइस 150W फास्ट चार्जिंगसह लाँच केला जाऊ शकतो.  

OnePlus 10 May Launch With 150W Fast Charging   | फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री 

फक्त 15 मिनिटांत फुल चार्ज होणार OnePlus 10; 12GB रॅम आणि वेगवान प्रोसेसरसह होऊ शकते एंट्री 

Next

OnePlus सध्या बाजारात आक्रमकरीत्या सक्रिय झाली आहे. कंपनी एकापाठोपाठ एक डिवाइस सादर करत आहे. यावर्षी भारतातात फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये OnePlus 10 Pro आला आहे. परंतु हा एकच फ्लॅगशिप डिवाइस देशात येणार नाही. लवकरच OnePlus 10 देखील ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो, ज्याचे स्पेसिफिकेशन्स आता लीक झाले आहेत.  

OnePlus 10 स्मार्टफोन जुन्या OnePlus 9 ची जागा घेईल. कंपनी या फोनचे Dimensity 9000 आणि Snapdragon 8 Gen 1 असे दोन मॉडेल टेस्ट करत आहे. हे दोन्ही प्रोसेसर फ्लॅगशिप लेव्हल आहेत. तसेच आता OnePlus 10 च्या फास्ट चार्जिंग, कॅमेरा आणि डिस्प्लेची लोकप्रिय टिपस्टर OnLeaks च्या हवाल्याने टेक वेबसाईट Digit नं दिली आहे. या फोनमध्ये आयकॉनिक अलर्ट स्लायडर मिळणार नाही.  

OnePlus 10 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

OnePlus 10 स्मार्टफोन 6.7-इंचाच्या Full HD+ AMOLED डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हा 120Hz रिफ्रेश रेटसह येणारा LTPO 2.0 पॅनल असेल. फोनमध्ये अँड्रॉइड 12 आधारित OxygenOS 12 असेल. वर सांगितल्याप्रमाणे दोन प्रोसेसर पैकी एकाची निवड करण्यात येईल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.  

OnePlus 10 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा, 16MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा असेल. या फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. OnePlus 10 स्मार्टफोन 150W फास्ट चार्जिंगसह बाजारात येईल. सोबत 15 मिनिटांत फुल चार्ज होणारी 4,800mAhची बॅटरी मिळू शकते.  

Web Title: OnePlus 10 May Launch With 150W Fast Charging  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.